
विटा : येथे दुचाकी, चारचाकी पार्किंगचा प्रश्न जटिल बनत चालला आहे. शहरातील मुख्य रस्त्यावर वारंवार वाहतूक कोंडी होत आहे. पालिकेचा वर्षानुवर्षे पार्किंग आराखडा कागदावर आहे. त्याची प्रत्यक्षात अद्यापही कृती झाली नाही. पालिका प्रशासनाच्या उदासीनतेमुळे शहरातील पार्किंगचे भिजत घोंगडे पडले आहे.