पारनेर - कृषी ऊत्पन्न बाजार समितीच्या सभापती बदलाला वेग

पारनेर - कृषी ऊत्पन्न बाजार समितीच्या सभापती बदलाला वेग

पारनेर - पारनेर तालुका कृषी ऊत्पन्न बाजार समितीच्या  सभापती बदलाला वेग आला असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे सुजीत झावरे यांनी आमदार विजय औटी यांच्या शिवसेनेच्या पाच संचालकांच्या मदतीने स्वपक्षीय सभापती प्रशांत गायकवाड यांना हटविण्याच्या मोहीमेला सुरूवात केली आहे. मात्र त्यांनी आपल्याच पक्षातील गायकवाड यांना हटविण्यासाठी आमदार औटी यांची घेतलेली मदत पक्षातील अनेकांना खटकली असून, ती पक्ष श्रेष्ठींनाही रूचेल का या चिंतेने झावरे यांना ग्रासले आहे.

बाजार समिती ही एकतमेव तालुका स्तरावरील सहकारी संस्था सुस्थीतीत आहे. तालुक्यातील इतर सहकारी संस्था काही बंद पडल्या काही बंद पाडल्या तर पारनेर सहकारी साखर कारखाण्यासारखी कामधेनूची राजकारण्यांच्या सहमतीने विक्रीही झाली. बाजार समिती सारखी सुस्थीतीत असलेल्या एकमेव सहकारी संस्थेतही राजरकारण घुसल्याने तीही मोडकळीस येऊ नये अशी तालुकावाशियांची इच्छा आहे. 

बाजार समिती राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या ताब्यात आहे.  त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे 10, काँग्रेसचे दोन व आमदार विजय औटी यांच्या शिवसेनेचे पाच संचालक आहेत. निवडीनंतर  राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रशांत गायकवाड यांना सभापती तर काँग्रेसचे विलास झावरे यांना ऊपसभापती करण्यात आले होते. 

त्या वेळी सभापती गायकवाड यांना एक वर्षासाठी सभापती पद देण्यात आल्याचे झावरे यांचे म्हणणे आहे तर सभापती गायकवाड यांच्या म्हणण्यानुसार तसे काहीच ठरलेच नाही. मात्र झावरे हे त्या वेळी गायकवाड यांनी आगामी तारखेचा दिलेला राजीनामाही आसल्याचे सांगत आहेत.

सध्या तालुक्यातील दोनही काँग्रेसमध्ये ऊघड ऊघड गटबाजी असून त्याच्यांत दोन गट आहेत. त्या मुळे या गटबाजीत गायकवाड यांचा बळी जाणार आहे. या दोनही गटांच्या अता बैठकांवर बैठक सुरू आहेत. 

झावरे यांच्याकडे त्यांच्या गटाचे आठ काँग्रेसचा एक व शिवसेचे पाच असे बलाबल असून, त्यांनी या संचालकांच्या गायकवाड यांच्या विरोधात अविश्वासाचा ठराव दाखल करण्यासाठी सह्याही घेतल्या आहेत. मात्र शिवसेनेच्या मदतीने आपल्याच पक्षातील सभापती गायकवाड यांच्या विरोधात अविश्वासाचा ठराव कसा मांडावा असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण गायकवाड यांच्या पाठीशी नाराज राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट आहे. शिवाय आपल्याच पक्षातील सभापतींना हटविण्यासाठी शिवसेनेची घेतलेली मदत ही पक्ष श्रेष्ठींबरोबरच जनतेलाही रूचेल का असा प्रश्न त्यांच्या समोर ऊपस्थीत झाला आहे. त्यामुळे गायकवाड यांनी स्वखुशीने राजीनामा द्यावा अशी झावरे यांची इच्छा आहे. 

सभापती बदलाबाबत सर्व संचालकांना संधी मिळावी हा प्रामाणिक हेतू असल्याचे झावरे सांगत आहेत. तर केवळ स्वार्था साठी ही खेळी असल्याचे गायकवाड व नाराज राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटाचे मत आहे. नुकतेच तालुक्यातील सर्व नाराज आमदार औटी यांच्या विरोधात एकत्र येत नगर पंचायतीमध्ये सत्तांतर घडविले आहे. अताही झावरे यांचे मनसुभे सर्व नाराज एकत्र येत ऊधळून लावण्याच्या विचारात आहेत. तर नगर पंचायतीचा बदला घेण्याची आयती संधी आल्याने  औटी यांनी झावरे यांना मदत करण्याचे ठरविल्याचे दिसते. शिवाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत गटबाजी ही औटी यांच्या फायद्याचीच ठरणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com