esakal | कार उड्डाणपुलावरून पडून संकेश्वरचा दुचाकीस्वार गंभीर
sakal

बोलून बातमी शोधा

accident

कार उड्डाणपुलावरून पडून संकेश्वरचा दुचाकीस्वार गंभीर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

संकेश्वर : येथील राष्ट्रीय महामार्गावर डी. फार्मसी महाविद्यालयानजिक उड्डाणपुलावरून कार खाली पडली. त्याखाली सापडून दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. शनिवारी (ता. 11) रात्री उशीरा हा अपघात घडला. कपील वैजाप्पा हिरेकर (वय 34, रा. हौसिंग कॉलनी, संकेश्वर) असे जखमीचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, येथील राष्ट्रीय महामार्गावर डी. फार्मसी महाविद्यालयानजिक उड्डाणपुलावरून निपाणीहून बेळगावच्या दिशेने जाणारी कार (केए 22 एमए 1085) खाली कोसळली. यावेळी उड्डानपुलाखालुन निपाणीहून संकेश्वरला दुचाकी (केए 23 ईएक्स 7996) जात होती.

या दुचाकीवर कार कोसळल्याने दुचाकीस्वार कपील वैजाप्पा हिरेकर हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्या डोक्याला व छातीला जबर मार लागला आहे. त्यांच्यावर बेळगाव येथील केएलई रूग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. कार खाली पडताच बलून उघडल्याने चालक बचावून किरकोळ जखमी झाला आहे. या अपघाताची नोंद संकेश्वर पोलिसात करण्यात आली आहे. पोलिस उपनिरीक्षक गणपती कोग्गेनहळ्ळी हे अधिक तपास करीत आहेत.

loading image
go to top