esakal | Belgaon: पाय घसरून तलावात पडल्याने तरूणाचा बुडून मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

बेळगाव : पाय घसरून तलावात पडल्याने तरूणाचा बुडून मृत्यू

sakal_logo
By
दत्ता लवांडे

बेळगाव : पाय घसरून तलावात पडल्याने तरूणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवार (ता.२) खादरवाडी (ता.बेळगांव) येथे दुपारी घडली आहे. हमदान मोहम्मदकासिम शेख (वय १८, रा. भारतनगर सहावा क्रॉस हुंचेनट्टी) असे त्याचे नाव असून घटनेची नोंद बेळगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात झाली आहे.

याबाबत पोलिसांतून समजलेली अधिक माहिती अशी, हुंचेनट्टी येथील हमदान हा आज दुपारी दोनच्या सुमारास आपल्या नातेवाईकांसह खादरवाडी येथील तलाव पाहण्यासाठी आला होता. तलावाच्या काठावर मातीच्या ढिगार्‍यावर थांबून पाहणी करत असताना अचानक पायाखालची माती ढासळली. त्यामुळे हमदान घसरत जाऊन तलावात पडला. तलावात पाणी अधिक असल्याने तो पाण्यात खोलवर गेला.

हेही वाचा: सातारा: दुचाकी-चारचाकीच्या भीषण अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार

त्यातच त्याला पोहता येत नसल्याने गटांगळ्या खात पाण्यात बुडाला. त्याठिकाणी त्याच्यासोबत असलेल्या नातेवाईकांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही वेळातच त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती गावात पसरताच घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. काही वेळानंतर बेळगाव ग्रामीण पोलीस आणि घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले. पाणबुडीच्या सहाय्याने शोध मोहीम राबवून मृतदेह चारच्या सुमारास पाण्याबाहेर काढण्यात आला. हमदानचे डिप्लोमा चे शिक्षण पूर्ण झाले होते. जिल्हा रुग्णालयातील शवाआगारात शल्य चिकित्सा करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

loading image
go to top