बोअरवेलमध्ये सापडला दोन वर्षांच्या चिमुकल्याचा मृतदेह; खुनाचा संशय

आलखनूर येथील घटना : खून करून टाकल्याचा संशय
death
deathsakal
Updated on

रायबाग : रायबाग तालुक्यातील आलखनूर येथे कूपनलिकेत पडून बालकाचा मृत्यू झाला. शनिवारी (ता. १८) ही घटना उघडकीस आली. शरद सिद्धाप्पा हसिरे (वय २) असे मृत बालकाचे नाव आहे. घटनास्थळ घरापासून शेतात लांबवर असल्याने खून करून टाकल्याचा संशय व्यक्त होत आहे. हारुगेरी पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, आलखनूर गावातून काल (ता.१७) बालक बेपत्ता झाल्याची फिर्याद पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. मात्र, बेपत्ता बालक कूपनलिकेत पडल्याचे आज (ता. १८) स्पष्ट झाले.

घटनेची माहिती समजताच हारुगेरी पोलिसांनी उपनिरीक्षक राघवेंद्र खोत यांच्या मार्गदर्शनाखाली धाव घेतली. बालकाला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले. त्यासाठी रायबाग अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले होते. घटनेचे गांभीर्य ओळखून तहसीलदार रियाज बागवान, अथणीचे पोलिस उपाधिक्षक एस. व्ही. गिरीश, मंडल पोलिस निरीक्षक के. एस. हट्टी, कुडची येथील पोलिस उपनिरीक्षक शिवराज दरीगौड दाखल झाले. सायंकाळी 5 नंतर बालकाला बाहेर काढण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करण्यात आले. मात्र रात्री आठ वाजण्याच्या सुमारास त्याचा मृतदेह हाती लागला. जिल्हा अग्निशामक दलाचे प्रमुख शशिधर हे देखील घटनास्थळी आले होते.

death
प्रोत्साहन देण्यापेक्षा समाज आमच्यावर दया दाखवतो - राधेय पिल्ले

घरापासून सुमारे तीनशे मीटर अंतरावर बालक पडलेली कूपनलिका आहे. एवढ्या लांबपर्यंत ते खेळत जाऊ शकणार नाही. त्यामुळे खून करून निर्दयीपणे मृतदेह कूपनलिकेत टाकल्याचा संशय व्यक्त होत आहे. त्या दृष्टीने पोलिसांकडून तपासाची शेतकरी फिरविण्यात येत आहेत. या घटनेमागे नेमके कोण आहे त्याचा उलगडा करण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.रात्री उशिरा उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह रायबाग सरकारी दवाखान्यात नेण्यात आला. मयत शरद याच्या मागे आई, वडील व भाऊ असा परिवार आहे.

आईने फोडलेल्या हंबरड्याने उपस्थितांच्या डोळ्यातही पाणी

शरद हा अवघ्या दोन वर्षांचा होता. गेल्या ९ सप्टेंबर रोजी त्याचा दुसरा वाढदिवस झाला होता. त्यानंतर अवघ्या दहा दिवसात त्याच्यावर काळाने झडप घातल्याने हळहळ व्यक्त होत आहे. यावेळी आईने फोडलेला हंबरडा पाहून उपस्थितांच्या डोळ्यातही पाणी आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Sakshi Pawar death after Renavi Ghat accident
Chandrakant Patil Announces Gazette Notification for Jat Taluka
Shirala Nag Panchami 2026
Sangli Miraj Urban Expansion and Drainage Crisis
Marathi News Esakal
www.esakal.com