पतंजलीकडून योगसाधना महोत्सव आणि शेतकरी मेळावा संपन्न

राजशेखर चौधरी
शनिवार, 17 मार्च 2018

अक्कलकोट : वळसंग (ता.दक्षिण सोलापूर) येथे हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत पतंजलीकडून योगसाधना महोत्सव आणि शेतकरी मेळावा मोठ्या उत्साहात  संपन्न झाला. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या आणि शेती केलेल्या आणि नंतर सन्यासत्व स्वीकारलेल्या योगगुरू रामदेवबाबा यांच्या उपस्थितीत हा उपक्रम संपन्न झाला.

विवेकानंद प्रतिष्ठान आणि पतंजली योगसमिती अक्कलकोट यांच्या संयुक्त विद्यमाने हा महोत्सव घेण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करताना योगगुरू रामदेव बाबा म्हणाले पतंजलीत १००० एकर सेंद्रिय शेती करत आहोत. एक लाख गायीचे संगोपन करून गोमूत्र पासून गोनाइल बनवीत आहोत. त्या माध्यमातून आजपर्यंत शेतकऱ्यांना १००० कोटी रुपये खरेदीपोटी देण्यात आले आहेत.

शेतकऱ्यांना रासायनिक औषधे आणि खते वापरायला प्रवृत्त करणे हे विदेशी कंपन्यांचे कारस्थान आहे. औषधी कोरफड १०० कोटी रुपयांची खरेदी केली आहेत. शेतकऱ्यांनी बहुउपयोगी आवळा, कोरफड आणि गुळवेल मोठ्या प्रमाणात लावावेत. ते पतंजली योग्य किंमत देऊन खरेदी करेल असे आश्वासीत केले. यावेळी तालुक्यातील सेंद्रिय शेती उत्पादक कृषी शेतकरी प्रमोद पाटील, काशीनाथ कापसे, राजशेखर उंबरणीकर, सोमेश्वर गुरव यांचा रामदेवबाबा यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

यावेळी सहकारमंत्री सुभाष देशमुख, सुमनादीदी, सचिन कल्याणशेट्टी, आनंद तानवडे, महेश हिंडोळे, दत्ता तानवडे, चंद्रकांत पवार, अक्कलकोट तालुका पतंजली योग समिती, सुधाताई अळ्ळीमोरे, शिरीष पाटील, वळसंगचे सरपंच महानंदा दुधगी, मल्लिनाथ कल्याणशेट्टी, मिलन कल्याणशेट्टी, मलकप्पा भरमशेट्टी, विकास तळवार आदींची उपस्थिती होती.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: patanjali and yogsadhana festival and farmers meet