सांगलीत पोर्टेबल मशिनद्वारे मिळाला 67 रूग्णांना ऑक्‍सीजन 

बलराज पवार
Wednesday, 16 September 2020

कोरोना रुग्ण सहाय्य समितीने सुरु केलेल्या पोर्टेबल मशिनद्वारे ऑक्‍सिजन पुरवठ्याचा लाभ 67 रुग्णांना झाला आहे. आटपाडीच्या शासकीय कोविड सेंटरसाठीही सोमवारी मध्यरात्री दोन मशिन पाठवण्यात आल्या.

सांगली : कोरोना रुग्ण सहाय्य समितीने सुरु केलेल्या पोर्टेबल मशिनद्वारे ऑक्‍सिजन पुरवठ्याचा लाभ 67 रुग्णांना झाला आहे. आटपाडीच्या शासकीय कोविड सेंटरसाठीही सोमवारी मध्यरात्री दोन मशिन पाठवण्यात आल्या. त्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांनाही याचा लाभ होत आहे. 

कोरोना रुग्ण सहाय्य व समन्वय समितीकडे 16 पोर्टेबल ऑक्‍सिजन मशिन आहेत. कोरोना रुग्णांसाठी या मशिन मोफत वापरण्यासाठी देण्यात येत आहेत. आतापर्यंत 67 रुग्णांना याचा फायदा झाला आहे. सध्या ऑक्‍सिजनची कमतरता असलेल्या कोरोनाबाधितांना शहरातील रुग्णालयांमध्ये बेडही मिळेनासे झाले आहेत. त्यामुळे ऑक्‍सिजनची गरज असलेल्या रुग्णांची फरफट होत आहे. अशावेळी कोरोना रुग्ण सहाय्य समितीने पोर्टेबल ऑक्‍सिजनच्या माध्यमातून रुग्णांना ऑक्‍सिजनची सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे. 

साखळकर म्हणाले, आटपाडीच्या कोरोना सेंटरमधून काल ऑक्‍सिजन मशिनसाठी सामाजिक कार्यकर्ते इम्रान पटेल यांचा फोन आला होता. तेथील रुग्णांसाठी चार ते पाच दिवसांसाठी ऑक्‍सिजन कव्हरटेड मशीन मिळतील का, फार गरज आहे असे सांगितले. त्यांची गरज लक्षात घेता दोन मशीन पाठवल्या. रात्री मशीन पोहोचल्या आणि रुग्णालयात त्यांचा वापर चालू करण्यात आला. 

साखळकर म्हणाले, आता विविध संस्थांच्या माध्यमातून पोर्टेबल ऑक्‍सिजन मशिन देण्याची सोय सुरु होत आहे. ऑक्‍सिजन लॅब नावाचा ग्रुप करुन अशा तातडीने पोर्टेबल ऑक्‍सिजनची सुविधा देणाऱ्या संस्थांना एकत्र आणण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यामुळे अगदी जिल्ह्यात कुणालाही ऑक्‍सिजनची गरज पडल्यास त्यांना जवळच्या संस्थेकडून ते उपलब्ध करण्याचा प्रयत्न करता येईल. 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 
 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: patients received oxygen through a portable machine