राजेंना जे शक्य हाेते ते पाटलांनी करुन दाखवलं

सकाळ वृत्तसेवा
Monday, 18 November 2019

संसदेत आज (साेमवार) पीठासीन अधिकारी राजेंद्र अग्रवाल यांनी श्रीनिवास पाटील यांचं स्वागत केलं.

नवी दिल्ली : आजपासून (साेमवार) संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरु झालं आहे.
त्या पार्श्वभूमीवर सातारा लाेकसभेचे नवनिर्वाचित खासदार श्रीनिवास पाटील यांनी खासदारकीची शपथ घेतली. श्रीनिवास पाटील यांनी आज (साेमवार) लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेतल्यानंतर पहिल्याच दिवशी लोकसभेत एक मुद्दा मांडला. 

पाटील म्हणाले की देशात केंद्रीय विद्यालयांची संख्या जर पाहिली तर सगळ्यात कमी संख्या ही महाराष्ट्रात आहे. सातारा जिल्ह्यात अनेक आजी-माजी लष्करी अधिकारी आहेत. अनेक शेतकऱ्यांच्या मुलांना लष्करात जाण्याची इच्छा असते.

त्यांच्यासाठी सातारा जिल्ह्यात कुठेही एक केंद्रीय विद्यालय सुरू करण्यात यावं, ही नम्र विनंती करतो. आपण त्याचे शिफारस करावी आणि तसे झाल्यास जनता आम्हांला आशिर्वाद देईल असं म्हणत त्यांनी आपले छाेटेखानी भाषण  संपवलं.

हेही वाचा -  उदयनराजेंना पराभूत करणाऱया श्रीनिवास पाटलांनी घेतली शपथ

तत्पुर्वी पीठासीन अधिकारी राजेंद्र अग्रवाल यांनी श्रीनिवास पाटील यांचं स्वागत केलं. अनेक दिवसांनंतर तुम्हाला ऐकण्याची संधी या सभागृहाला मिळाली आहे, असं म्हणत त्यांनी श्रीनिवास पाटील याचं स्वागत केलं. पाटील यांनी मग पीठासीन अधिकाऱ्यांचे आभार मानले. 

भाषण साेशल मिडीयावर व्हायरल

खासदारकीचा राजीनामा देत उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम केला. अवघ्या तीन महिन्यात त्यांनी पक्ष सोडून भाजपात प्रवेश केला. त्यामुळे सातारा लोकसभा जागेसाठी पोटनिवडणूक घेण्यात आली. या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून श्रीनिवास पाटील तर भाजपाकडून उदयनराजे भोसले उभे होते. या निवडणुकीत श्रीनिवास पाटील यांनी उदयनराजेंचा पराभव केला.
दरम्यान उदयनराजे खासदार असताना संसदेत फारसे बाेलत नसतं अशी त्यांच्यावर टीका केली जात असे. त्यापार्श्वभुमीवर आज (साेमवार) श्रीनिवास पाटील यांनी केलेले छाेटेखानी भाषण साेशल मिडीयावर व्हायरल हाेऊ लागले आहे. 

 

 

 

 

 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Patil Did It What Raje Could Do It