रेशन धान्य दुकानदारांना विमा संरक्षण, प्रलंबित कमिशन तत्काळ द्या.... 

विष्णू मोहिते 
Wednesday, 16 September 2020

राज्यातील रेशन दुकानदारांना विमा संरक्षण द्यावे तसेच धान्य वाटप केलेले प्रलंबित कमिशन तात्काळ मिळावे यासाठी जिल्ह्यातील दुकानदारानी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज आंदोलन केले.

सांगली : राज्यातील रेशन धान्य दुकानदारांनी 1 सप्टेंबर पासून संप पुकारला आहे. दुकानदारांना विमा संरक्षण द्यावे तसेच धान्य वाटप केलेले प्रलंबित कमिशन तात्काळ मिळावे यासाठी जिल्ह्यातील दुकानदारानी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज आंदोलन केले. जिल्ह्यातील रेशन दुकानदारांची संख्या 1356 आहे. 

सध्या कोरोना आजाराचा प्रादुर्भाव वाढला आहे. दैनंदिन व्यवहार करणे मुश्‍कील झाले आहे. आमची दुकाने अत्यावश्‍यक सेवेत येतात. एप्रिल ते माहे जुलै पर्यंत राज्य शासनाने दुकानदार यांच्या थमवर धान्य वाटपास परवानगी दिली होती. तसे धान्य वाटप झाले आहे. सध्या ऑगष्ट महिन्यापासुन शिधापत्रिकाधारकांच्या थमवर धान्य वाटप करावे असे आदेश काढले आहेत. या आदेशा विरुध्द मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने पॉज मशिन वर धान्य वाटप करु नये, असा आदेश दिला आहे. मुंबई उच्च न्यायालय येथे रास्त भाव दुकानदार यांना इतरा प्रमाणे विमा संरक्षण कवच द्यावे, अशी मागणी केली आहे. 

धान्य दुकानदार यांनी माहे जुनमध्ये केसरी शिधापत्रिका धारकांना धान्य वाटपाचे मजुरी घेवुन चलनाने पैसे भरलेले आहेत. ते पैंसे किंवा धान्य मिळावे. सुमारे 150 दुकानदार पॉझीटिव्ह आले आहेत. या परिस्थितीमध्ये दुकानदार शिधापत्रिका धारकाचा थम लावुन धान्य वाटप थांबवावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. जिल्हाध्यक्ष मुबारक मौलवी, उपाध्यक्ष प्रभाकर कुरळकर, रमजान बागवान, आय. बी. शेख, जयसिंग देसाई, संजय चव्हाण, राजू पखाले यांच्यासह दुकानदार उपस्थित होते. 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 
 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pay insurance grain protection to ration grain shopkeepers