
सांगली : ‘महावितरण’ने ऑनलाईन वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांचा टक्का वाढविण्याच्या उद्देेशाने लकी डिजिटल ग्राहक योजना सुरू केली आहे. योजनेसाठी ३१ मार्च २०२४ नंतर सलग तीन वेळा ऑनलाईन पद्धतीने वीज बिल भरणा करणारे सर्व लघुदाब वीज ग्राहक पात्र ठरणार आहेत. १ जानेवारी ते ३१ मे २०२५ या कालावधीत सलग तीन वा तीनहून अधिक वीज बिले भरून योजनेच्या लाभाची संधी ग्राहकांना उपलब्ध करण्यात आली आहे.