कोल्हापूर : मृत्यू कधी कोणाला कवटाळेल काही सांगता येत नाही. अशीच एक दु:खद घटना पंढरपूर तालुक्यात घडलीये. सामान्य कुटुंबातून येऊन घरी असलेले अठरा विश्व दारिद्र्य दूर करावे यासाठी खूप वाचावं, शिकावं आणि मोठं व्हावं हे शिवाजी विद्यापीठ (Shivaji University) राज्यशास्त्र विभागातील पीएच. डी. संशोधक गणेश सातपुते (Ganesh Satpute Passes Away) याचं स्वप्न थांबलं आहे.