इथून झाला कांदा गायब... 

इथून झाला कांदा गायब... 
Updated on

ब्रह्मपुरी (जि. सोलापूर) : कांदा सर्वांच्या आहारातील महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे साहजिकच तो लोकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. दर वाढल्याने हाॅटेलातील अनेक पदार्थातून कांदा गायब झाल्याचे चित्र दिसत आहे. 
कांदा हा सर्रास प्रत्येक घरात वापरण्यात येतो. त्यामुळे कांद्याच्या दरात वाढ झाल्यास सरकारलाही घाम फुटतो. सोलापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत उन्हाळा कांद्याच्या दराने चांगली उसळी घेतली आहे. बाजारपेठेत त्याला जास्त मागणी असून उच्चांकी दर गाठला आहे. हिवाळा सुरू झाला की गरमागरम कांदा भजी, कांदा पोहे, अन्य पदार्थांचा स्वाद घेतला जातो. परंतु, कांद्याच्या वाढत्या दराने असे पदार्थ गायब झाल्याचे चित्र दिसत आहे. हॉटेल असो किंवा घर कांदा थोड्या प्रमाणात वापरत असतात. 

सततचा दुष्काळ आणि परतीच्या पावसाने उभे कांद्याचे पीक पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले होते. मात्र, हाच कांदा आता शेतकऱ्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आणत आहे. जिल्ह्यातील बहुतेक कृषी उत्पन्न बाजार समितीत 20 ते 25 पिशवी कांदा आणला असता प्रति किलो 100 ते 125 रुपये असा चांगला दर मिळाल्याने सध्या शेतकरी लखपती झाला आहे. त्यामुळे हा कांदा सफरचंदच्या दराने विकण्यात येत आहे. 

जिल्ह्यात रब्बी हंगामात कांद्याची लागवड केली जाते. कांदा पिकाकरिता मोठा भांडवली खर्च करावा लागतो. परंतु, कांदा काढणीच्या वेळी कांद्याला योग्य बाजारभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागतो. त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होतो. दुसरीकडे साठवून ठेवलेला उन्हाळा कांदा विकून काही शेतकरी लखपती होत आहेत. मात्र, पुढील काळात शेतमालाला हमीभाव दिला पाहिजे, अशी मागणी शेतकरी करत आहेत. परंतु, सद्यस्थितीत कांद्याचे दर आवाक्‍याबाहेर गेले असून त्याच्याशिवाय अन्न पदार्थ खाण्याची वेळ सामान्यांना आल्याचे चित्र दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Maharashtra IT Park investment project
Atpadi Illegal Sand Mining
Maharashtra Farm Loan Waiver Scheme 2026
How to apply for MHADA Sangli housing?
Marathi News Esakal
www.esakal.com