फोन का उचलला नाही? मद्यपी तरुणाची आमदाराच्या कार्यालयावर दगडफेक

Throwing stones MLA office
Throwing stones MLA officesakal
Updated on

बेळगाव : आमदारांनी फोन उचलला नाही म्हणून रागाच्या भरात मद्यपी तरुणाने उत्तरचे आमदार अनिल बेनके यांच्या चव्हाट गल्ली येथील कार्यालयावर दगडफेक करून तोडफोड केली. रविवारी (ता.१३) रात्री ११.३० च्या सुमारास ही घटना घडली असून, याप्रकरणी मार्केट पोलिसांनी आपणच सत्यम ज्योतिबा नाईक (रा. चव्हाट गल्ली) याच्या विरोधात गुन्हा दाखल करून घेतला आहे.

उत्तर मतदार संघाचे आमदार अनिल बेनके यांचे चव्हाट गल्ली येथे कार्यालय आहे. रविवारी रात्री साडे अकराच्या सुमारास त्यांच्या कार्यालयावर दगडफेक करून तोडफोड झाली. रात्रीच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे परिसरात काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती समजताच मार्केट पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली.

आमदारांच्या कार्यालयावर दगडफेक झाल्याने परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यात आले. त्यामध्ये सत्यम नाईक या तरुणाची छबी कॅमेऱ्यात कैद झाल्याचे दिसून आले. बंगळूर येथे सुरू असलेल्या अधिवेशनानिमित्त आमदार बेळगावात नसल्याने पोलिसांनी या प्रकरणी स्वतःच गुन्हा दाखल करून घेतला. सत्यम हा फरारी झाला असल्याने पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे. पोलिस निरीक्षक मल्लिकार्जुन तुळसीगेरी व त्यांचे सहकारी तपास करीत आहेत. आमदारांनी फोन उचला नसल्याने रागाच्याभरात दारूच्या नशेमध्ये त्याने हे कृत्य केले असल्याचे पोलिसांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Red Bull Breaks the Ritual Barrier as Salgare Preserves 202-Year Bendur Tradition
Sangli Anti Corruption Bureau trap
Latest Koyna Dam storage report
MD Drugs Replace Gang Rivalries: Organized Crime Network Tightens Grip in Western Maharashtra
Marathi News Esakal
www.esakal.com