मुलाकडून आईवर शारीरिक अत्याचार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 मे 2019

वाई तालुक्‍यातील एका गावात गुरुवारी (ता. 16) रात्री मुलानेच आईवर शारीरिक अत्याचार केल्याची घटना घडली. त्या वेळी प्रतिकार करायला गेलेल्या वडिलांनाही डोक्‍यात दगड घालून मुलाने जखमी केले. संशयिताला पोलिसांनी अटक केली आहे.

भुईंज (जि. सातारा) - वाई तालुक्‍यातील एका गावात गुरुवारी (ता. 16) रात्री मुलानेच आईवर शारीरिक अत्याचार केल्याची घटना घडली. त्या वेळी प्रतिकार करायला गेलेल्या वडिलांनाही डोक्‍यात दगड घालून मुलाने जखमी केले. संशयिताला पोलिसांनी अटक केली आहे.

पीडित महिला काल गावदेव जेवणावरून घरी आल्या. ओट्यावर बसलेला त्यांचा मुलगाही पाठोपाठ घरात गेला. त्याने घराला आतून कडी लावली. महिलेने आरडाओरडा केला तेव्हा मुलाने त्यांचा गळा दाबून कानाला चावा घेतला व शारीरिक अत्याचार केला. शेजाऱ्यांनी महिलेच्या पतीला बोलावून आणले. जोरदार धडक देऊन पतीने घराचे दार उघडले व पत्नीला मुलापासून सोडवून घराबोहर आणले. त्या वेळी मुलाने वडिलांच्या डोक्‍यात दगड घातला. त्यात ते गंभीर जखमी झाले. पीडित महिला मजुरी करते.

Web Title: physical torture of the mother by son crime