
सांगली : संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम जिल्हास्तरीय स्पर्धा सन २०२३-२४ मध्ये कवठेमहांकाळ तालुक्यातील पिंपळवाडीने पहिले स्थान पटकावले. तासगाव तालुक्यातील धामणी व वाळवा तालुक्यातील बोरगाव यांना विभागून द्वितीय, तर कापरी (ता. शिराळा) यांना विभागून तृतीय क्रमांक मिळविला. याशिवाय तीन ग्रामपंचायतींना विशेष पुरस्कार घोषित करण्यात आला आहे.