esakal | बापरे...सांगलीत सर्वत्र अननसचे ढीगच ढीग...कशामुळे आवक वाढली?
sakal

बोलून बातमी शोधा

pineapple.jpg

सांगली- कर्नाटकातील निपाणी (जि. बेळगाव) येथील मार्केट बंद असल्यामुळे तेथील अननसचा व्यापार गेल्या दोन आठवड्यापासून सांगलीत स्थलांतर झाला आहे. सांगलीच्या फळमार्केटमध्ये सध्या 40 ते 50 टनाची आवक होऊ लागली आहे. तर सांगलीच्या रस्त्यावर सर्वत्र अननसाचे ढिग दिसू लागले आहेत. सर्वत्र घमघमाट सुटला आहे. शंभर रूपयाला दोन नग विकले जात असून ग्राहकांकडून खरेदीसाठी प्रतिसाद मिळत आहे. 

बापरे...सांगलीत सर्वत्र अननसचे ढीगच ढीग...कशामुळे आवक वाढली?

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

सांगली- कर्नाटकातील निपाणी (जि. बेळगाव) येथील मार्केट बंद असल्यामुळे तेथील अननसचा व्यापार गेल्या दोन आठवड्यापासून सांगलीत स्थलांतर झाला आहे. सांगलीच्या फळमार्केटमध्ये सध्या 40 ते 50 टनाची आवक होऊ लागली आहे. तर सांगलीच्या रस्त्यावर सर्वत्र अननसाचे ढिग दिसू लागले आहेत. सर्वत्र घमघमाट सुटला आहे. शंभर रूपयाला दोन नग विकले जात असून ग्राहकांकडून खरेदीसाठी प्रतिसाद मिळत आहे. 


पावसाळ्याची चाहूल लागली की बाजारात अननसचा घमघमाट सुरू होतो. द्राक्ष, आंब्याचा हंगाम संपत आल्यानंतर अननस बाजारपेठेत येऊ लागते. इतर फळांपेक्षा अननसचा वास सर्वाधिक असतो. त्यामुळे बाजारात विक्रेत्यांनी अननस कापून त्याचे काप विकायला ठेवण्यास सुरवात केली पेठेत वास दरवळतो. एरव्ही अननस 80 ते शंभर रूपयाला विकले जाते. परंतू यंदा बाजाराऐवजी शहरातील रस्त्यारस्त्यांवर अननसचे ढीग लागल्याचे चित्र दिसून येत आहे. रस्त्यावर ढीग लावण्याबरोबरच मालवाहू टेम्पो भरून अननस विकले जात आहे. सध्या शंभर रूपयाला दोन नग याप्रमाणे विक्री सुरू आहे. सांगलीच्या बाजारात आवक वाढल्यामुळे ग्राहकांना यंदा अननसचा स्वाद स्वस्तात अनुभवण्यास येत आहे. 

कर्नाटकातील कारवार भागातील सागर, शिरसी आदी परिसरात अननसचे उत्पादन होते. आपल्याकडे कोकणातही अननस उत्पादन होते. कर्नाटकातील निपाणीच्या मार्केटमधून अननस आपल्याकडे येते. सांगलीच्या विष्णूअण्णा फळमार्केटमध्ये प्रतिवर्षी अननसची आवक होते. परंतू त्याचे प्रमाण कमी असते. "कोरोना' मुळे निपाणीचे मार्केट महिन्याहून अधिक काळ बंद आहे. त्यामुळे तेथील अननसचा व्यापार सांगलीकडे स्थलांतर झाला आहे. 

सांगलीच्या फळ मार्केटमध्ये "राजा' जातीच्या अननसची आवक वाढू लागली आहे. कर्नाटक परिसरातून दररोज 40 ते 50 टन अननस येत आहे. 12 ते 20 रूपये किलो याप्रमाणे उलाढाल सुरू आहे. टेम्पो भरून येत असलेले अननस सांगलीतील सर्व रस्त्यावर ढीग लावून तसेच स्टॉल लावून विकले जात आहेत. त्यामुळे सर्वत्र अननसचा घमघमाट पसरला आहे. अननस उष्णता निर्माण करणारे फळ असून पावसाळ्यापूर्वी उत्पादन सुरू होते. उष्णता निर्माण करणारे अननस अनेकजण आवडीने खातात. आवक वाढल्यामुळे दर कमी असून ग्राहक गाड्या थांबवून अननस खरेदी करत असल्याचे चित्र दिसत आहे. 
 

""कर्नाटकातील "राजा' जातीचे अननसची फळ मार्केटमध्ये आवक वाढली आहे. आवक जास्त असून दर कमी आहे. त्यामुळे मागणीही वाढली आहे. दर 12 ते 20 रूपये प्रति किलो इतका आहे. निपाणीतील मार्केट बंद असल्यामुळे सांगलीत अननसची बाजारपेठ निर्माण झाली आहे.'' 
-सागर मदने (व्यापारी, विष्णूअण्णा फळमार्केट) 
 

loading image