बांबू लागवड करा; पर्यावरणाचे रक्षण करा 

Plant bamboo; Protect the environment
Plant bamboo; Protect the environment

दुधोंडी : सध्या विविध क्षेत्रात बांबूचा वापर जागतिक स्तरावर वाढत आहे. पर्यावरण संरक्षण जागतिक तापमान वाढीसह स्वच्छ वातावरण इथून पुढे राखायचे असल्यास शेतकऱ्यांनी इतर पिकाबरोबर बांबू लागवड करून स्वतःच्या विकासाबरोबर पर्यावरणाचेही रक्षण करावे, असे आवाहन निवृत्त वनाधिकारी अजित भोसले यांनी केले. 

ते दुधोंडी (ता. पलूस) येथे कृष्णाकाठ उद्योगसमूह व माझी माय कृष्णा या संस्थेच्या माध्यमातून दुधोंडी कृष्णा नदी काठावरील सर्वच गावांतील नदी काठी बांबू लागवड संदर्भात सर्व्हे करण्याकरिता घेण्यात आलेल्या दौऱ्यावेळी बोलत होते. मानसिंग बॅंकेचे संस्थापक जे. के. बापू जाधव पर्यावरण संरक्षक गतिविधी संयोजक डॉ. मनोज कुमार पाटील, निवृत्ती वनाधिकारी अजित भोसले, मंडल वन अकॅडमी निरीक्षक दिलीप गुजेला, जलसंपदा विभागाचे निवृत्त कार्यकारी अभियंता विलास चौथाई आदींच्या उपस्थितीमध्ये कृष्णा घाटावरील दुधोंडी, तुपारी, दह्यारी, साटपेवाडी, पुणदी, आमणापूर, नवेखेड आदी गावांतील नदीकाठाची पाहणी करण्यात आली. 

डॉ. मनोजकुमार पाटील म्हणाले,""कृष्णा नदीच्या दोन्ही काठांवर किमान दोन ओळी बांबूची लागवड केली. तर नदीकाठ सुरक्षित राहण्यास बरोबर नदीचे पाणीही स्वच्छ व सुरक्षित राहील पुराचा धोका काही अंशी कमी होण्यास मदत होईल. त्यासाठी या परिसरातील शेतकऱ्यांनी माझी माय कृष्णा ही संस्था राबवित असलेल्या बांबू लागवडीस सहकार्य करावे.'' जे. के. बापू जाधव म्हणाले,""आपण प्रथमपासूनच शेतकऱ्यांच्या हिताचे उपक्रम राबवत आलो आहे. बांबू लागवड या उपक्रमात नदीकाठावरील सर्व शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला तर कृष्णा नदीचे नंदनवन झाल्याशिवाय राहणार नाही.'' 

यावेळी मानसिंग बॅंकेचे अध्यक्ष सुधीर जाधव, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष डॉ. नागराज रानमाळे, भारती शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मिलिंद जाधव, दुधोंडीचे उपसरपंच रवींद्र नलवडे, संजय जाधव, संदीप पाटील, हुतात्मा कारखान्याचे संचालक गणपती पाटील, हणमंत कदम, जुनेखेडचे सरपंच डॉ. विशाल कुंभार, सरपंच सुनील पाटील, किरण चव्हाण, दादासो चव्हाण, अशोक साटपे, शशिकांत साटपे, संपत पापा पाटील, उपसरपंच शंकर पाटील, नितीन पाटील, योगेश लोखंडे, संभाजी जाधव, अनिल कुमार जाधव आदींसह नदीकाठावरील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार प्रमोद जाधव यांनी मानले. 

संपादन : प्रफुल्ल सुतार 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com