"पीएनजी' चषक ऑनलाईन बुद्धिबळात  इराणचा अली फागीर नवाज विजेता 

घनश्‍याम नवाथे
Wednesday, 28 October 2020

सांगली-  नूतन बुध्दिबळ मंडळातर्फे आयोजित आणि मे. पुरूषोत्तम नारायण गाडगीळ सराफ, सांगली पुरस्कृत "पीएनजी चषक' ऑनलाईन खुल्या बुध्दिबळ स्पर्धेत इराणच्या अली फागीर नवाज याने विजेतेपद पटकावले. 

सांगली-  नूतन बुध्दिबळ मंडळातर्फे आयोजित आणि मे. पुरूषोत्तम नारायण गाडगीळ सराफ, सांगली पुरस्कृत "पीएनजी चषक' ऑनलाईन खुल्या बुध्दिबळ स्पर्धेत इराणच्या अली फागीर नवाज याने विजेतेपद पटकावले. 

ऑनलाईन स्पर्धेत इराण, अझरबैजान या देशासह भारतातील तामिळनाडू, आंध्रप्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, केरळ, गोवा, कर्नाटक, दिल्ली, पश्‍चिम बंगाल आदि राज्यातील 697 बुध्दिबळपटू सहभागी झाले होते. त्यामध्ये 3 ग्रॅण्डमास्टर, 3 आंतरराष्ट्रीयमास्टर, 5 फिडेमास्टर आणि 2 कॅन्डेडमास्टरसह सांगली जिल्हयांतील 89 बुध्दिबळपटू सहभागी झाले होते.

खुल्या गटात इराणच्या अली फागीर नवाजने 45 गुणासह विजेतेपद मिळवले. तामिळनाडूच्या आर. आर. लक्ष्मणने 45 गुणासह द्वितीय क्रमांक मिळवला. तामिळनाडूच्या जुबेन जिमीने 44 गुणासह तृतीय, केरळच्या श्रीहर एल. आर. ने 43 गुणासह चौथा, तामिळनाडूच्या अरूल आनंद एस.पी. के याने 42 गुणासह पाचवा, देवी दयाल सिंगने 40 गुणासह सहावा, अझरबैजानचा ग्रॅण्डमास्टर रॅसल्ह व्हॅंगरने सातवा, आंध्रच्या शंकर रेड्डीने आठवा, तामिळनाडूच्या अर्जुन कल्याणने नववा आणि पश्‍चिम बंगालच्या शुभयांन कंद्रुने दहावा क्रमांक मिळवला. 

तसेच गोव्याच्या पार्थ साळवीने अकरावा, महाराष्ट्राच्या यश वाठारकरने बारावा, दिल्लीच्या आर्यन वृष्णीने तेरावा, बंगालच्या अनुस्तूप बिस्वासने चौदावा, महाराष्ट्राच्या प्रितम पांडाने पंधरावा क्रमांक मिळवला. सांगली जिल्हा खुला गटात समीर कठमाळे, अभिषेक पाटील, आदित्य खैरमोडे, हदीन महात, आदित्य कोळी यानी अनुक्रमे क्रमांक मिळवला. 15 वर्षे गटात रविप्रकाश मोर्या, पार्थ सारडा, सारा हरोले, मृण्मयी गोसावी, 12 गटात ईशान कुलकर्णी, अव्दीक फडके, सृष्टी हिप्परगी, जिया महात, 9 वर्षे गटात आदित्य चव्हाण, आशिष मोटे, अनुजा कोळी, शौर्या नंदेश्वर उत्कृष्ठ खेळाडू ठरले. 

फिडे पंच दिपक वायचळ, शार्दुल तपासे, सौ. पौर्णिमा उपळावीकर- माने यांनी काम पाहिले. "पीएनजी' चे संचालक मिलींद गाडगीळ यांच्याहस्ते ऑनलाईन पद्धतीने पारितोषिक वितरण झाले. चिंतामणी लिमये यावेळी उपस्थित होते. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: "PNG 'Cup in online chess Ali Fagir Nawaz of Iran won