लॉकडाउनमध्ये पलूस तालुक्‍यात पोलिसांचा हिसका

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 जून 2020

पलूस पोलिस ठाणे कार्यक्षेत्रात पलूस शहरासह इतर काही गावे येतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने संचारबंदी लागू केली. तसेच कोरोना विषाणूंचा प्रसार रोखण्यासाठी मंदिरे, मद्य विक्री, तंबाखू जन्य पदार्थ विक्री, हॉटेल, बेकरी व इतर खाद्यपदार्थ विक्री यावर बंदी घातली. काही काळ इतर दुकाने बंद ठेवण्यात आली.

पलूस (सांगली) - पोलिसांनी लॉकडाउन काळात पलूस पोलिस ठाणे कार्यक्षेत्रात आतापर्यंत 252 गुन्हे दाखल केले. तर तब्बल चार लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे, अशी माहिती पलूस पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विकास जाधव यांनी दिली. 

पलूस पोलिस ठाणे कार्यक्षेत्रात पलूस शहरासह इतर काही गावे येतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने संचारबंदी लागू केली. तसेच कोरोना विषाणूंचा प्रसार रोखण्यासाठी मंदिरे, मद्य विक्री, तंबाखू जन्य पदार्थ विक्री, हॉटेल, बेकरी व इतर खाद्यपदार्थ विक्री यावर बंदी घातली. काही काळ इतर दुकाने बंद ठेवण्यात आली. त्याचबरोबर दुचाकीवरून डबल सिट व चारचाकीमधून चालकासह तीन पेक्षा जादा प्रवासी नसणे, तोंडाला मास्कचा वापर न करणे, राज्य व जिल्हा बंदी असतानाही आदेशाचा भंग करून प्रवेश करणे, रस्त्यावर उगीचच फिरणे, सोशल डिस्टन्सचे पालन न करणे, अशा विविध सूचनांचे पालन न करणारांवर पलूस पोलिसांनी नजर ठेवून, रात्रंदिवस काम केले. पलूस शहरासह इतर गावात नाकेबंदी केली.

कडक पहारा ठेवला. मात्र, शासन आदेशाचे व नियममांचे पालन न करणारांवर पलूस पोलिसांनी गुन्हे दाखल केले. पोलिस अधिकारी व कर्मचारी यांना शिक्षक पोलिस, माजी सैनिक, पोलिस मित्र इतरांची चांगली साथ मिळाली. लॉकडाउन सुरू झालेपासून पलूस पोलिसांनी राज्य व जिल्ह्याबाहेरुन विनापरवाना आलेल्या 3, बंद काळात दुकान सुरू ठेवणारे 3, मास्कचा वापर न करणारे 193, संचारबंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी 43 अशा एकूण 252 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. त्यांच्याकडून चार लाख रुपयांपेक्षा जास्त दंड वसूल करण्यात आला आहे. 

पलूस पोलिस ठाणे कार्यक्षेत्रात लॉकडाउनपासून पोलिस कर्मचारी, आरोग्य विभाग व प्रशासनाच्या इतर विभागाने चांगले काम केले. अजूनही करीत आहेत. सुदैवाने या ठिकाणी एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडला नाही. यामध्ये नागरिकांनी मोठे सहकार्य केले. याही पुढे समाजातील सर्व घटकांनी सहकार्य करावे. 
- विकास जाधव, सहायक पोलिस निरीक्षक, पलूस. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: police action palus taluka sangli district