दरोड्याच्या तयारीतील टोळी गजाआड, पाचजण फरार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 मार्च 2020

ही टोळी दरोडा टाकण्याच्या तयारीत असून  जामखेड तालुक्यातील साकत फाट्यावर दबा धरुन बसल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक निलेश कांबळे,पोलिस काँन्स्टेबल बाजीराव सानप यांना मिळाली. त्यांनी दरोड्याच्या तयारीत असलेल्या या टोळीवर छापा घातला.
 

जामखेड :  जामखेड येथे रात्रीच्या वेळी पोलिस गस्तीवर असलेल्या पोलीस उपनिरीक्षक  निलेश कांबळे यांनी पोलीस पथकाच्या मदतीने दाखविलेल्या  प्रसंगावधानामुळे जामखेड तालुक्यात दरोड्याच्या तयारीत असलेली 'टोळी'गजाआड केली.  त्यांनी रचलेला दरोड्याचा 'कट' उधळून लावला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. या टोळीतील  एकास  साहित्यासह गजाआड केले. पोलिसांनी केलेल्या या कारवाईचं समाजाच्या विविध स्तरातून कौतुक होत आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी ; रविवार (ता.22 ) दिवसभर कर्फ्यू होता.पोलिस प्रशासनाने शहरात व संपूर्ण तालुक्यात नागरिकांना रस्त्यावर फिरु दिले नाही.करोना व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी चांगली कामगिरी केली. पोलिस प्रशासन दिवसभर रस्त्यावर घातलेल्या गस्तीमुळे दमलेले होते. याचा फायदा काही भामट्यांनी उचलण्याचा 'कट' आखला. 

हेही वाचा - नगरमध्ये भरला मूर्खांचा बाजार, बघा व्हिडिअो

ही टोळी दरोडा टाकण्याच्या तयारीत असून  जामखेड तालुक्यातील साकत फाट्यावर दबा धरुन बसल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक निलेश कांबळे,पोलिस काँन्स्टेबल बाजीराव सानप यांना मिळाली. त्यांनी दरोड्याच्या तयारीत असलेल्या या टोळीवर छापा घालून मोतिराम टेकाळे ह्यास पकडले. पाच जण अंधाराचा फायदा घेत पसार झाले. 
पकडलेल्या अरोपी मोतिराम याच्याकडे रिव्हाँल्व्हर, मिरची पुड, दरोडा टाकण्यासाठी लागणारे इतर साहित्य मिळाले.

यासंदर्भात पोलिस काँन्स्टेबल बाजीराव सानप यांनी दिलेल्या फिर्यादेवरुन सहा जणांविरोधात  दरोड्याच्या तयारीत असल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. अटक केलेल्या आरोपीला न्यायालयात हजर केले असता ता. २६ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. 

या टोळीत मोतीराम मुरलीधर टेकाळे याच्यासह
ऋषिकेश गोवर्धन सानप, अजय भरत सानप, विशाल भाऊसाहेब कुमटकर, सचिन कांबळे, राम सांगळे सर्व रा. सौताडा (ता. पाटोदा) यांचा समावेश होता. या सहाजणांविरोधात दरोड्याची तयारी, अर्म अँक्ट, जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन यासह विविध गून्हे दाखल करण्यात आले आहेत. 
पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रभाकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश कांबळे करीत आहेत.
 

कोरोना व्हायरस


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police arrest gang for robbery