सोलापूर :..अन् पोलिसच झाले आरोपी

सोलापूर :..अन् पोलिसच झाले आरोपी

सोलापूर : आरोपीला गुन्ह्यात मदत करण्यासाठी तीन हजारांची लाच घेणाऱ्या पोलिस नाईक महेश कालिदास दराडे (वय 35), पोलिस नाईक संतोष व्हन्नाप्पा राठोड (वय 43) या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी सायंकाळी रंगेहाथ पकडले. हे दराडे आणि राठोड हे फौजदार चावडी पोलिस ठाण्याचे कर्मचारी आहेत. 

तक्रारदार व्यक्तीविरोधात फौजदार चावडी पोलिसात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात मदत करण्यासाठी पोलिस नाईक दराडे आणि राठोड यांनी पाच हजारांची लाच मागितली. तडजोडीअंती तीन हजार रुपये ठरले. राठोड याने लाचेची रक्कम दराडेकडे देण्यास सांगितले. ठरल्याप्रमाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अरविंदधाम पोलिस वसाहत परिसरात सापळा लावला. तीन हजारांची लाच घेताना दरोड यास रंगेहाथ पकडले. राठोड यास नंतर अटक केली. 

एसीबीचे पोलीस उपअधीक्षक अजितकुमार जाधव, पोलिस निरीक्षक जगदीश भोपळे, सहायक फौजदार निलकंठ जाधवर, पोलिस हवालदार संजय बिराजदार, पोलिस शिपाई सिध्दराम देशमुख, चालक शाम सुरवसे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. 

स्वत:च झाले आरोपी

या गुन्ह्यातील तक्रारदारावर फौजदार पोलिसात गुन्हा दाखल होता. त्या गुन्ह्यात अटक केल्यानंतर तो पोलिसांच्या रखवालीतून पळून गेला होता. याप्रकरणात त्याच्यावर दुसरा गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यात मदत करण्यासाठी पोलिस नाईक महेश दराडे आणि पोलिस नाईक संतोष राठोड यांनी लाच घेतल्याचे समोर आले आहे. आरोपीला मदत करण्याच्या नादात दराडे आणि राठोड हे स्वत:च आरोपी झाले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com