esakal | पोलिसांनी मागवले सागर खोतांचे मोबाईल लोकेशन
sakal

बोलून बातमी शोधा

पोलिसांनी मागवले सागर खोतांचे मोबाईल लोकेशन

पोलिसांनी मागवले सागर खोतांचे मोबाईल लोकेशन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सांगली : रयत क्रांती संघटनेचे युवा नेते सागर खोत यांच्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या तांबवे येथील कार्यकर्त्याला मारहाणीचा आरोप करण्यात आला आहे. तशी तक्रार पोलिसांत देण्यात आली आहे. हा प्रकार घडला त्यावेळी सागर तेथे नव्हताच, असा खुलासा आमदार सदाभाऊ खोत यांनी केला आहे. या पार्श्‍वभूमीवर पोलिसांनी सागर यांचे मोबाईल लोकेशन काढले आहे. ते साडेआठ ते साडे अकरापर्यंत कोल्हापूर परिसरात आणि एका हॉटेलमध्ये असल्याने समोर आल्याचे खोत समर्थकांकडून सांगण्यात आले.

तांबवे येथील स्वाभिमानीचे कार्यकर्ते रविकिरण माने यांच्या घरात जावून रयत क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जाब विचारला. त्याबाबतचा एक व्हिडिओ सदाभाऊ समर्थकांनीच व्हायरल केला आहे. त्यात माने यांनी वापरलेली भाषा आणि तेथील सागर खोत यांची अनुपस्थिती याकडे लक्ष वेधले आहे. दुसरीकडे पोलिसांनी सागर खोत हाणामारीच्या ठिकाणी नव्हते तर कुठे होते, याची चौकशी सुरु केली आहे. हे प्रकरण आता थेट गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यापर्यंत पोहचले आहे. दुसरीकडे स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि रयत क्रांती संघटनेत सुरु असलेला शाब्दिक संघर्ष आणि हातघाईवर आला आहे.

हेही वाचा: खबरदार! शेजाऱ्याची वीज चोराल तर...? काय सांगतो कायदा?

त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे पोलिस अधिक सावध आणि काही बाबतीत आक्रमक आहेत. त्यामुळेच त्यांनी सागर खोत यांच्या या प्रकरणातील थेट सहभागाविषयीचे सर्व पदर उलगडून पहात आहेत.

loading image
go to top