sangli police
sakal
सांगली - सांगली, मिरज आणि कुपवाड शहरातील झुंडशाही मोडण्यासाठी अधीक्षक संदीप घुगे यांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या झुंडशाहीला ठोकून काढत यानिमित्ताने कायद्याचा धाक निर्माण केला जाणार आहे. शहरातील ‘डार्क स्पॉट’वरील नशेखोर आणि हुल्लडबाजांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. त्यासाठी स्थानिक पोलिसांसह एलसीबी, विशेष शाखा, राखीव दल, जलद कृती दलाचा यात समावेश राहणार आहे.