सिम कार्ड बदलले आणि अडकला पोलिसांच्या जाळ्यात

police investigation for karad murder
police investigation for karad murder

तसे पाहिले तर पोलिसांना तपास करताना अनेक अडचणी येतात. प्रत्येक वेळी परिस्थितीजन्य पुराव्यांवर तपास करून पोलिस गुन्ह्याची पाळेमुळे खणून काढताना दिसतात. कार्वे येथे वर्षांपूर्वी झालेल्या खुनाचाही असाच रोमांचकारी तपास पोलिसांनी केला. त्या तपासातही पोलिसांना त्यांच्या खबऱ्यांसह मोबाईल लोकेशनचा हातभार लागल्याने तो तपास तडीस नेण्यात यश आले. कऱ्हाडातून अपहरण करून कर्नाटकात नेऊन एकाला संपविण्याचे कट कारस्थान रचणाऱ्या एका महिलेसह दोघांना पोलिसांनी चलाखीने गजाआड केले होते. वरिष्ठ पोलिस निरीक्षक मुरलीधर मुळूक यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे कर्नाटकातील खुनाची पाळेमुळे पोलिसांना खनून काढता आली होती. त्याबद्दल त्या तपासातील त्या पथकाचा पोलिस खात्यातर्फे गौरव झाला होता. 

सुमारे अकरा वर्षापूर्वी कऱ्हाड तालुक्‍यातील कार्वे येथील एकजण बेपत्ता होता. त्याची नॉर्मल तक्रार पोलिसात बेपत्ता म्हणून दाखल झाली होती. मात्र त्या व्यक्तीसोबत घातपात झाल्याची शक्‍यता काहीजण वर्तवली जात होती. काही महत्वाची माहिती पोलिसांच्या हाती लागली. वरिष्ठ पोलिस निरिक्षक मुरलीधर मुळूक यांनाही खबऱ्याव्दारे काही माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांना तालुका पोलिस ठाण्याच्या डीबीसह शहर पोलिसांच्या पथकाचा मदत घेतली. बेपत्ता झालेल्या व्यक्तीची माहिती जमा करण्यात आली. त्या व्यक्तीबरबोर घातपात झाल्याची खात्री पोलिसांना पटू लागली. त्या व्यक्तीच्या अवती भवतीचीही माहिती घेण्यात आली. त्यावेळी अनैतिक संबध असल्याची शंकाही काही व्यक्तींनी वर्तवली. त्यानुसारही पोलिसांनी तपास केला. मात्र फारसे काही हाती आले नाही. त्यानंतर काहींनी ती व्यक्ती ज्या दिवशी बेपत्ता झाली. त्यावेळी त्या व्यक्तीसोबत एका महिलेसह तिघेजण होते, अशी महत्वाची माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी संबधित महिलेसह त्या दोन व्यक्तींचा शोध सुरू केला. मात्र त्यावेळीही त्यांच्या हाती काहीही आले नाही. मात्र शोध घेणारे सारेच लोक बेपत्ता आहेत, अशी तपासाची साखळी जुळवणारी महत्वाची माहिती पोलिसांच्या हाती आली. त्यावरून पोलिसांनी तपासाचा स्वर्ग गाठला. पोलिसांचा संशय अधिक बळावल्याने त्यांनी गतीने तपासाची चक्रे फिरवली. त्या गुन्ह्याच्या तपासा करण्यासाठी चार पथके नेमण्यात आली. संबधित चारही व्यक्तींच्या ठिकाणी छापे टाकण्यात आले. त्या चारही व्यक्ती कुठेच आढळल्या नाहीत. बेपत्ता व्यक्ती सोबत त्या चारही व्यक्ती बेपत्ता होत्या. त्यामुळे पोलिसांची चिंता वाढली. ती माहिती कोणाला सांगितली तर एकाच वेळी चार लोक बेपत्ता झाल्याचे साऱ्यांनाच समजली तर मोठा गलका होईल, अशी पोलिसांना भिती होती. त्यानुसार गुन्ह्याच्या सगळी सुत्रे पोलिस निरिक्षक मुळूक यांनी स्वतःकडेच घेतली होती. त्यांनी त्या संपूर्ण घटनेचा अभ्यास केला. त्यांनी काही लोकांकडे चौकशी केली. त्यावेळी त्यांना बेपत्ता असलेल्या पैकी एकाकडे मोबाईल असल्याचे लक्षात आले. त्यांना मोबाईल लोकेशन पाहिली. त्यावेळी त्याचे लोकेशन पहिल्यांदा कर्नाटकात दाखवले गेले. त्यामुळे शंका बळावली. त्यानंतर तीन दिवसांना कार्वे लोकेशन दाखवले. त्यावेळी पोलिसांनी सापळा रचला. मात्र त्यातूनही ती व्यक्ती फरार होण्यास यशस्वी झाली. त्यानंतर दोन दिवसांनी त्या व्यक्तीचा फोन ट्रेस झाला. त्यावेळी त्याचे लोकेशन कर्नाटक होते. पोलिसांनी तो पत्ता टिपून टेवला. त्यानंतर त्या व्यक्तीचा फोन स्वीच ऑफ झाला. त्याच व्यक्तीने त्याच मोबाईलमध्ये दुसरे सीम कार्ड घातले अन्‌ ती व्यक्ती पोलिसांच्या जाळ्यात अडकली. त्याच ठिकाणचे लोकेशन दिसून आले. 

कर्नाटकातील पत्त्याची खात्री झाल्यानंतर पोलिसांनी पुन्हा तपासाची सुत्रे हलवली. त्यांनी खबऱ्याव्दारे माहिती मिळवली. त्यावेळी ज्या व्यक्तीचा पोलिस फोन ट्रेस करत होते. ती व्यक्ती बेपत्ता व्यक्ती सोबत होती, याची खात्री पोलिसांना झाली. पोलिसांनी टिपून टेवलेल्या कर्नाटकातील पत्ता शोधून काढला. पोलिस निरिक्षक मुळूक यांच्यासह पथक त्या दिशेने रवाना झाले. कर्नाटकातील त्या गावात पोलिसांनी दोन दिवस डेरा टाकला. अखेर मोबाईल लोकेशनवरली ती व्यक्ती पोलिसांच्या हाती आळी. त्यांनी त्याच्याकडे कसून चौकशी केली. त्यावेळी त्याने संबधित व्यक्तीचा खून केल्याची कबुली तर दिलीच. त्याशिवाय कर्नाटकात जेथे खून करून त्या व्यक्तीला पुरले होते, तीही जागा दाखवली. त्यावेळी पोलिसांनी कायदेशीर सोपस्कर पूर्ण करत तपासाचा कड गाठला. जी व्यक्ती बेपत्ता होती. त्याचा खून झाल्याची खात्री पटली होती. संबधिताने पुरलेले शवही पोलिसाच्या हाती लागले होते. आता कसोटी होती. या खूनात सामील असलेल्या आणखी दोघांच्या तपासाचे. खूनाची कबुली दिलेल्या संशयीताने ते दोघेही कऱ्हाडला गेल्याचे सांगितले. त्यामुळे त्याला घेवून पोलिस कऱ्हाडकडे आले. त्या दोघांनाही येथे जेरबंद केले. कार्वे येथील संबधीत व्यक्तीचे अपहरण करून त्याचा खून केल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. अपहरण कऱ्हाडमधून झाले होते. खून कर्नाटकात केला होता. मात्र केवळ पोलिसांचे खबऱ्यांचे जाळे, मोबाईल लोकेशन, एकाच वेळी चौघांचे बेपत्ता होणे, त्यानंतर मोबाईल स्वीच ऑफ करून पुन्हा चालू करणे आदी सगळ्या गोष्टी संशयीतांच्या विरोधात गेल्या. त्याच परिस्थितीजन्य पुराव्यांच्या अधार घेत पोलिसांना बेपत्ता झालेल्या व्यक्तीच्या अफहरणासह खुनाचा गुन्हा मोठ्या कष्टाने उघडकीस आणला होता. 

अपहरण करणाराच पोलिसांच्या मोबाईल लोकेशनमध्ये सापडला होता. तोच खुनाच्या कटाचा मुख्य सूत्रधार होता. खून झालेल्या संशयिताचे महिलेबरोबर संबंध आहेत, अशी शंका संबंधित संशयिताला आली होती. म्हणून त्याचे अपहरण करून त्याला कर्नाटकात नेऊन त्याचा खून करण्याचा कट त्याने रचला होता. त्यात तो बऱ्यपैकी यशस्वीही झाला होता. मात्र, दोन वेळा मोबाईल स्वीच ऑफ करणे आणि त्यानंतर सीमकार्ड बदलणे त्याला महागात पडले. त्या कृतीने पोलिसांचा संशय बळावला आणि तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com