नेर्ले चौकात ते बसले होते गप्पा मारत, हे पाहून पोलिसांनी दिला काठीचा प्रसाद...

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 मार्च 2020

कोरोनाचा वाढता प्रभाव वाढल्याने प्रशासनाने राज्यात संचार बंदीचे आदेश काढले आहेत तरीही काही युवक चौकाचौकात ग्रुपने बसलेले पोलिसांच्या निदर्शनास आले.

नेर्ले (सांगली) - येथील विविध चौकात विनाकारण गप्पा मारत बसलेल्या युवकांना पोलिसांच्या काठीचा महाप्रसाद मिळाला.कोरोनाचा वाढता प्रभाव वाढल्याने प्रशासनाने राज्यात संचार बंदीचे आदेश काढले आहेत तरीही काही युवक चौकाचौकात ग्रुपने बसलेले पोलिसांच्या निदर्शनास आले.

कासेगाव पोलिसांनी कारवाई करत चौकात असलेल्या युवकांना चोपून काढले. त्यामुळे आज दिवसभरात काही युवक घराबाहेर पडले नाहीत. कासेगाव पोलीस सातत्याने गावातील लोकांना सूचना देत आहेत. युवकांना आवाहन करत आहेत. तरीदेखील अनेक लोक घराबाहेर पडताना दिसून येतात. पुणे - मुंबईहून आलेले काही युवक गावातून फेरफटका मारत असल्याचे दुर्दैवी चित्र आहे. याकडे ग्रामपंचायत व गावातील युवकांनी लक्ष देणे गरजेचे आहे. बाहेरून येणारी अनेक वाहने गावात प्रवेश करीत आहेत. पुणे-मुंबई  व परदेशातून अनेक 137 लोक वास्तव्यासाठी आलेले आहेत. बाहेरुन आलेल्या लोकांनी घरातच बसावे असे आवाहन करण्यात येत आहे. परंतु याकडे दुर्लक्ष होत आहे.
 

भागात संचारबंदी असून परगाववरून आलेले व गावातील युवकांनी घोळक्याने बसू नये अन्यथा त्यांच्यावर कारवाई केली जाईल.गर्दी करू नये.
 सोमनाथ वाघ - सहायक पोलिस निरीक्षक कासेगाव 

पुणे - मुंबई व परदेशातून आलेल्या लोकांनी घरात बसावे.विनाकारण गावाला त्रास होईल असे वर्तन करू नये.गावातील लोकांनी संयम पाळून घरी बसावे.
हर्षद पाटील - उपाध्यक्ष,आधार फाउंडेशन नेर्ले


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: police lathicharge in nerle sangli