
कुंभारी (ता. जत, जि. सांगली) येथील पोलीस पाटील रवींद्र गणपती जाधव यांनी पोलीस पाटीलपदी नियुक्ती करताना प्रतिज्ञापत्रात गुन्हा दाखल नसल्याची खोटी माहिती दिल्याने प्रांताधिकारी प्रशांत आवटे यांनी महाराष्ट्र ग्रामपोलीस अधिनियम कायद्यानुसार त्यांचे पद रद्दची कारवाई केली.
जत : कुंभारी (ता. जत, जि. सांगली) येथील पोलीस पाटील रवींद्र गणपती जाधव यांनी पोलीस पाटीलपदी नियुक्ती करताना प्रतिज्ञापत्रात गुन्हा दाखल नसल्याची खोटी माहिती दिल्याने प्रांताधिकारी प्रशांत आवटे यांनी महाराष्ट्र ग्रामपोलीस अधिनियम कायद्यानुसार त्यांचे पद रद्दची कारवाई केली.
याबाबत मिळालेली माहिती अशी, की जत पोलीस ठाण्यात कुंभारी येथील पोलीस पाटील रवींद्र जाधव यांच्या विरोधात पोलिस पाटीलपदी नियुक्ती होण्यापूर्वी त्यांच्यावर सन 2011 साली गुन्हा नोंद होता. दरम्यान, पोलीस पाटीलपदी रवींद्र जाधव यांनी नियुक्ती होते. वेळी गुन्हे दाखल नसल्याबाबतचे पुरावे प्रशासनाकडे दिले होते. परंतु पोलीस पाटील जाधव यांनी स्वतावर गुन्हा नोंद असताना प्रशासनाकडे पोलीस पाटीलपदी नियुक्त होण्यासाठी चुकीची माहिती सादर केल्याची तक्रार काका तातोबा शिंदे यांनी केली होती.
शिंदे यांनी पोलीस पाटील जाधव यांच्यावर गुन्हा दाखल असताना देखील त्यांनी शासनाची फसवणूक करून पोलीस पाटीलपदी नियुक्ती स्वीकारल्याचे पुरावे सादर केले होते.
दरम्यान, या तक्रारीनुसार प्रांताधिकारी आवटे यांनी पडताळणी केली असता जाधव हे पोलीस पाटीलपदी नियुक्ती होण्यापूर्वी जत पोलीस ठाणे यांच्याकडे गुन्हा दाखल होता. सदरचा गुन्हा असताना देखील कोणत्याही प्रकारचा माझ्यावर गुन्हा दाखल नसल्याचे जाधव यांनी प्रतिज्ञापत्रात स्पष्ट केले होते. कुंभारी येथे पोलीस पाटीलपदी जाधव असले तरी ते जत शहरातील विद्यानगर येथे राहावयास असल्याचे देखील तक्रार करण्यात आली होती. परंतू सदरची मिळकत त्यांच्या वडिलार्जित असल्याने व पोलीस पाटील जाधव यांनी कुंभारी येथील रहिवासी असल्याबाबतचे पुरावे दिल्याने सदरचा मुद्दा प्रांताधिकारी प्रशांत आवटे यांनी अमान्य केला आहे.
संपादन : युवराज यादव