Video : किती वेळा सांगितले तरी पहिले पाढे पंचावन्न;सातारकरहाे काळजी घ्या

Video : किती वेळा सांगितले तरी पहिले पाढे पंचावन्न;सातारकरहाे काळजी घ्या
Updated on

कऱ्हाड - सातारा  : देशात आणि राज्यात सध्या कोरोना व्हायरसच्या पार्श्वभुमीवर संचारबंदी आहे. नागरीकांनी या काळात घरीच बसावे, बाहेर पडु नये यासाठी ही उपाययोजना केली आहे. मात्र तरीही कऱ्हाड आणि सातारा शहर व परिसरात नागरीक विनाकारण फिरत आहेत. या नागरिकांवर आता कारवाई करण्यास प्रारंभ झाला आहे. कराड येथे तब्बल ४० दुचाकी तसेच सातारा येथे 10 दुचाकी, एक तीन चाकी तसेच चार चाकी  जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

कोरोनाने सर्वत्र सध्या हाहाकार माजला आहे. त्याचा फैलाव वाढत असल्याने सरकारकडुन आवश्यक त्या उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. त्यामध्ये एकमेकांचा संपर्क टाळणे हाच मोठा उपाय असल्याने प्रत्येक आपल्या घरीच रहावे यासाठी सध्या संचारबंदी, लॉकडाऊन घोषीत करण्यात आला आहे. त्यामुळे सध्या सर्वत्र शांतता असुन रस्तेही ओस पडले आहेत.

पोलिसांनी ठिकठिकाणी बॅरीकेटींग करुन रस्ते बंद केले आहेत. त्यामुळे फारशी वाहतुक सुरु नाही. मात्र तरीही या महामारीच्या काळात कऱ्हाड शहर व परिसरात विनाकारण काहीजण फिरत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यावरुन पोलिस उपाधिक्षक सुरज गुरव, वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील, वाहतुक शाखेचे प्रमुख सहाय्यक पोलिस निरीक्षक विकास बडवे, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय गोडसे यांच्यासह अन्य अधिकारी व कर्मचारी यांनी शहर व परिसरात विनाकारण फिरणाऱ्यांच्याविरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे.

त्यामध्ये विनाकारण फिरणाऱ्या तब्बल ४० जणांच्या दुचाकी जप्त केल्या आहेत. शहरातील वीजय दिवस चौक, कोल्हापुर नाका, साईबाबा मंदीर परिसर आदी ठिकाणी ही कारवाई करण्यात आली. त्यामुळे आता विनाकारण फिरणाऱ्यांनी चांगलाच धसका घेतला आहे.

पोलिसांकडून वर्दीचा गैरवापर हाेत आहे अशी भावना काहींची झाली आहे. त्यांच्याकडून काही चूका हाेत असतील पण ते २४ तास सेवेत आहे. तरीही पाेलिसांवर टीका हाेतच आहे. त्यांचे मनाेबल वाढविण्यासाठी एसपी तेजस्वी सातपुते काय म्हणाल्या कशा प्रकारे परिस्थिती हााताळा याबाबत सविस्तर वाचा

सातारा शहरात देखील शहर पाेलिस स्टेशननजीक आज (शुक्रवार) विनाकारण रस्त्यांवर वाहन घेऊन आलेल्यांवर कारवाई करण्यात आली. जीवनावश्यक वस्तू घरानजीक घ्याव्यात अशा सूचना प्रशासनाने केल्या आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Why is kharif sowing delayed in Sangli?
Sangli Satara MLC election result 2026
Investigation Update: Mhamdya Nadaf’s Role in the Murder Conspiracy
Infrastructure Milestone: Trial Run on the 3.47km Karad Flyover
Marathi News Esakal
www.esakal.com