Video : पोलिसांकडून वर्दीचा गैरवापर ?; एसपींचा संदेश लाखाेंचे आपण पालक, काळजी घ्या

सिद्धार्थ लाटकर
गुरुवार, 26 मार्च 2020

आपण स्वतःच्या काळजी घेणे आवश्यक आहे. त्याचबराेबर आपण आणि समाज आपल्याला एकमेकां विरुद्ध उभे नाही राहयाचे. आपल्याला एकमेकांसाेबत  उभे राहायचे आहे आणि हे युद्ध जिंकायचे आहे. मी तुमच्या साेबत आहे. आपण स्वतःची काळजी घ्या आणि कृपया लाेकांची काळजी घ्या असे ही एसपी सातपुते यांनी नमूद केले आहे.

सातारा : काेराेना व्हायरसचा संसर्ग वाढू नये यासाठी देशात २१ दिवसांचा लाॅकडाऊन करण्यात आला आहे. त्यानुषंगाने महाराष्ट्रात देखील खबरादारी घेतली आहे. राज्यात संचार बंदी लागू झाली. त्याची अंमलबजावणी सातारा जिल्ह्यात देखील चाेखपणे करण्यात येत आहे. जिल्हा प्रशासन आणि सातारा पाेलिस दल यांच्यावतीने सातत्याने वेगवेगळया विभागाच्या बैठका सुरु असतात. रस्त्यांवर आवश्यक असेल तरच नागरिकांनी बाहेर पडावे असे आवाहन करण्यात आले आहे. जीवनावश्यक वस्तुंची दुकानदारांना देखील नियमावली करुन देण्यात आली आहे. मुख्य बाजारपेठेत कामाशिवाय आलेल्या युवकांना पाेलिस चांगलाच हिसका दाखवित आहेत. त्याचे व्हिडिआे ही साेशल मिडियावर धडकू लागले आहेत. यामुळे गरज नसताना रस्त्यावर येणारी मंडळी आता घरीच थांबत आहे.  

दूसरीकडे मात्र गेल्या दाेन दिवसांत माेती चाैक , नगरपालिका परिसरात काही आैषध विक्रेत्यांच्या कामगारांना काेणतीही विचारपूस न करता पाेलिसांना मारल्याची घटना घडली. त्यानंतर फटकविलेल्या कामगारांनी शहरातील आैषध विक्रेत्यांच्या दुकानांमध्ये माल पाेचविण्यासाठी आम्ही जाणार नसल्याचे त्यांच्या मालकांना सांगितले. त्यामुळे आजच्या घडीला आैषध विक्रेत्यांना जागेवर माल मिळण्यास अडचण ठरत आहे. त्यांचे दुकान सांभाळून हाेलसेल व्यावसायिकांकडे माल आणण्यासाठी जावे लागत आहे. एकेका दुकानात तीन माणसे असल्याने त्यांची तारंबाळ उडत आहे. काहीशी अशीच परिस्थिती इंटरनेट सेवा पूरविणारे यांची झाली आहे. सातारा शहर व परिसरातील २२ जणांनी बीएसएनएल बराेबर करार केला आहे. एफटीटीएच सेवा देण्यासाठी पूरवठाधारकांचे कामगार देखील पाेलिसांना घाबरले आहेत. त्या कामगारांचे मते आमच्याकडे बीएसएनएलचे अथवा आमच्या मालकाकडे काेणत्याच प्रकारचे आयकार्ड नाही. त्यामुळे आम्हांला भिती वाटते. आम्हांला काही तरी देणे अपेक्षीत आहे. तरच आम्ही लाेकांना सेवा पूरवू शकताे. जिल्हा रुग्णालयात कामास असलेल्या पत्नीस घरुन रुग्णालयात आणि रुग्णालयातून घरी ने-आणि करणारे एका व्यक्तीस देखील पाेलिस अडवत असल्याची तक्रार समाेर आली. त्यामुळे काही वेळेला शाब्दिक चकमकी देखील उडत आहेत.  

बुधवारी (ता.२५) सायंकाळच्या सुमारास तालुका पाेलिस स्टेशन समाेर एका व्यक्ती बहुधा रस्त्यावर आल्याने पाेलिसाने त्याच्यावर बडगा उगारला. एक दाेन काठ्या खाल्यानंतर त्याव्यक्तीने सरळ पाेलिसलाच धरले. त्याच्या मानुगट आवळून धरली. त्यानंतर तेथे काही अंतरावर असलेले काही पाेलिस तेथे आले. त्यांनी संबंधित व्यक्तीपासून पाेलिसाला बाजू केले. पाेलिसाच्या अन्य सहकारी यांनी संबंधित व्यक्तीस काठ्या मारल्या. चिडलेल्या व्यक्तीने पाेलिसांची काठी हिसकावून घेत त्यांच्यावर चाल केली. काही क्षणांत तेथे उपस्थित असलेल्या पाेलिसांनी त्याचा समाचार घेतला.

आई जाण्याचे दुःख बाजूला ठेऊन त्यांनी बजावले कर्तव्य

हा सर्व प्रकार तेथे राहणारे शिवाजी भाेसले यांनी आपल्या माेबाईलमध्ये टिपला. भाेसले यांनी फेसबुकवर पाेलिसांच्या कार्यपद्धतीबाबत खेद व्यक्त केला आहे.  तसेच याबाबत गृहमंत्री अनिल देशमुख आणि पाेलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्याकडे संबंधित पाेलिसांवर कारवाईची मागणी केली आहे. त्यांना त्याबाबतचे आश्वासनही मिळाल्याचे ते नमूद करतात. दरम्यान हा व्हिडिआे साेशल मिडियावर व्हायरल हाेत आहे. या प्रकाराबाबत उलट सुलट प्रतिक्रिया व्यक्त हाेत आहेत. 

एसपींचा संदेश लाखाेंचे आपण पालक, काळजी घ्या

पाेलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी बुधवारी (ता.२५) रात्री अधिकारी आणि कर्मचारी यांना एक संदेश पाठविला आहे.हा संदेश साेशल मिडियातून जनतेपर्यंंतही पाेहचत आहे. यामध्ये त्यांनी पाेलिसांच्या कामाच्या काैतुक करतानाच काही महत्वाच्या सूचना दिल्या आहेत. पाेलिस आणि समाज एकत्ररित्या राहून काेराेनाचे युद्ध जिंकायचे आहे असे ही त्यांनी नमूद केले आहे.
 
तेजस्वी सातपुते आपल्या संदेशात म्हणतात गेले अनेक दिवस आपण काेराेनाच्या दृष्टीकाेनातून प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून वेगवेगळे कर्तव्य पार पाडत आहाेत.  गेल्या चार दिवसांपासून आपण अत्यंत खडतर असणारे काम म्हणजे संचारबंदीचे यशस्वीरित्या अंमलबजावणी करण्याचे काम करीत आहाेत. बहुतांश कर्मचारी हे अतिशय उत्तम काम करीत आहेत. खूप त्रासात आहे. उन्हात उभे राहावे लागत आहे. तासनतास काम करावे लागत आहे. जेवणाचे हाल हाेत आहेत. पण तरी सुद्धा आपले कर्मचारी न डगमता चांगले काम करायचे साेडत नाही. मला खराेखर तुमच्या सगळ्यांचा अभिमान वाटताे. परंतु अपवादत्मक परिस्थितीमध्ये आपल्याकडून काही चूका हाेताना दिसत आहेत. अत्यावश्यक सेवा देणारे व्यक्ती, काही लाेक, त्यांचे मदतनीस, त्यांच्या गाड्या अडविल्याच्या तक्रारी येत आहेत. या तक्रारी येऊ नयेत, आपल्याला काेणाला अडवायचे आहे आणि काेणाला नाही याची कल्पना मी आपणांस यापुर्वीच दिली आहे. तक्रारींची संख्या दिवसेंदिवस कमी हाेत आहे परंतु अजूनही त्या थांबलेल्या नाहीत. 

मित्रांनाे लक्षात घ्या आपल्या सर्वांवर खूप माेठी जबाबदारी आहे. संचारबंदी, जमावबंदीची अंमलबजावणीचे, ३३ लाखांच्या सातारामध्ये २७०० लाेकांनी हे काम करुन दाखविणे खराेखराे साेपे नाही.  हे शिवधन्युष्य आपण सर्वजण पेलत आहाेत. तुम्ही सर्वजण पेलत आहात. बहुतांश लाेक हे समजदार आहेत. ३३ लाखांपैकी किती लाेक दिसतात आपल्याला बाहेर येणारे. बहुतांश लाेक आदेशाचे पालन करीत आहेत. ते समजदारच आहेत. काही लाेक आहेत ते याबाबतीत असहकार्य करीत आहे. काही लाेक जाणून बुजून खाेडसाळपणा म्हणून करतात, काही लाेकांची खराेखर अडचण असते, काही लाेकांना परिस्थितीची कल्पना नसते. म्हणून हे लाेक आपले शत्रू आहेत असे धरुन चालालयचे नका. याच लाेकांच्या सुरक्षिततेसाठी आपण चाैका चाैकात उभे आहाेत. दिवस रात्र कार्यरत आहाेत. या लाेकांचे भलेच करायचे आहे आपल्या डाेक्यात कायम असले पाहिजे. काही असहकार्य करीत आहेत. म्हणून सरसकट आलेल्यांना अशासकीय भाषा , असभ्य भाषा आपल्या  ताेंडून जाता कामा नये. आपण त्रासात आहात मला सर्व मान्य आहे. परंतु आपल्याला संयमाने काम करावे लागेल. 

नवीन जीवन शैली आहे ही. लाेक इतके दिवस आपल्या आपल्या रुटीनमध्ये हाेते. गेले चार दिवस अचनाक ठप्प झालेले आहे आणि त्यांना घरी बसावे लागत आहे. ही नवीन जीवन शैली अंगीकारायला सिस्टीम व्यवस्थित सेट व्हायला थाेडासा वेळ लागणार आहे. लाेकांना नाही माहिती गर्दी आहे की नाही दुकानात. ते स्वतःचे सामान घेण्यासाठी चालले आहेत. त्यांना तेथे गेल्यावर समजणार आहे अरे इथ तर खूप गर्दी आहे. ते परत जाऊही शकत नाहीत. म्हणून आपल्याला त्यांच्यासाठी याेग्य त्या उपाययाेजना करावयाच्या आहेत. प्रत्येक किराणा, मेडीकल, दूधाच्या दुकानांसमाेर ग्राहकांसाठी तीन तीन फुटांचे अंतर ठेवायचे आहे. आपल्याला सातत्याने त्यांच्यापर्यंत माहिती पाेचवायची आहे. काळजी करुन नका साहित्य मिळेल असे त्यांच्यावर विश्वास बिंबवयाचा आहे. २१ दिवस जीवनावश्यक सेवा सुरुच राहणार आहे. यामध्ये  आपल्याला समन्वयाची खूप म्हत्वाची भुमिका बजावयाची आहे.

#WeVsVirus : ब्राॅडबॅंड कनेक्शनसाठी आम्हांला संपर्क साधा : बीएसएनएल

हे करीत असताना आपल्याला अनावशयक बळाचा वापर करावयाचा नाही. बळाचा वापर केला.  पाच दहा लाेक आले तुम्ही त्यांच्याकडे काठी घेऊन धावला, की ते पळतील. तुम्हांला कादचित क्षणीक सुख वाटेल त्याचे अरे वा आपण काठी घेऊन गेलाे आणि दहा लाेक पळाले. परंतु याचा लाॅंग टर्म इफेक्ट चांगला हाेणार नाही. त्या दहा जणांपैकी कदाचित तीन चार लाेक हे अंत्यत महत्वाच्या कामासाठी बाहेर पडले असतील. परंतु ते जेव्हा तुमच्या लाठीला घाबरुन, तुमच्या आक्रमतेला पाहून घाबरुन पळतील तेव्हा ते मनात हीच गाेष्ट ठेवतील पाेलिसांमुळे आपले काम झाले नाही. पाेलिसांमुळे आपले हाल झाले. आपण त्यांच्यासाठी दिवस रात्र उभे आहाेत. त्यांच्या सुरक्षीततेसाठी, त्यांनी साेशल डिस्टंस ठेवावे म्हणून, हे करीत असताना आपली एक छाेटीशी चूकीची कृती लाेकांच्या मनात पाेलिसांविषयी जी सन्मानाची भावना निर्माण व्हायला हवी त्याच्या उलट भावना निर्माण करु शकते. आपली प्रत्येक कृती खूप जपून करायची आहे. 
  
सर्व लाेकांना एकसारखी ट्रिटमेंट देऊ नका. लाेकंाना एेका त्यांचे म्हणणे एेका. त्यांचे आेळखपत्र पहा. त्यांना सहकार्य करा. तुम्ही आम्ही जसे २४ तास महत्वाचे काम करीत आहे आपल्या सुद्धा दाेन पावले पूढे जाऊन वैद्यकीय सेवा, नर्सेस , डाॅक्टर, मेडीकल प्रॅक्टीशनर्स हे काम करीत आहेत. त्यांना आपल्याकडून त्रास हाेत असेल तर ते जर आपआपल्या दवाखान्यांमध्ये पाेचले नाहीत तर आजारी लाेकांचे उपचार काेण करणार. आपण जर दूधवाल्या माणसाला अडवयाला लागलाे तर घराघरातील छाेटे मुले काय खाणार काय पिणार. भाजीपाल्याचे, फळांचे गाड्या अडवू लागलाे तर हे बाजारपर्यंत पाेहचणार नाही. पर्यायाने लाेकांच्या घरापर्यंत पाेहचू शकणार नाही. मग साहजिकच लाेकांचा संताप वाढणार. २१ दिवस हे आपल्याला चालवयाचे आहे. संयमाने वागा.

जी गाेष्ट परवानगीत आहे. ज्याला परवानगी आहे अशा व्यक्तीला निष्कारण अडवून नका. त्यांना आपण सर्वांना आेळखपत्र लावा असे सांगितले आहे. तेवढा संयम ठेवा. त्यांना सहकार्य करा. ते सुद्धा आपल्यातीलच आहे. जे काेराेनाची भिती बाहेर असताना सुद्धा हे काम असताना बाहेर पडत आहेत. कृपया त्यांना सहकार्य करा. काेणताही पद्धतीचा त्रास आपल्यामुळे हाेईल अशा प्रकारची कृती करु नका. 

काही लाेक असे आहेत जे निष्कारण तुम्हांला बाहेर फिरताना दिसतील. श्वानांना फिरायला आणलेले दिसतील. सकाळी धावण्यासाठी, जाॅगिंग करण्यासाठी जातील. वारंवार आपण त्यांना सांगत असून देखील ते काही लाेक खाेडसाळपणा करतील परंतु त्यांना सुद्धा मारहाण करायची नाही. त्यांना सूचना द्या तुम्ही तात्काळ घरी जा. त्यांनी एेकले नाही तर त्यांना पाेलिस स्टेशनला आणून त्यांच्यावर कठाेर कायदेशीर कारवाई करा. त्यांनी करीत असलेली चूक ही त्यांच्या फक्त एकट्याच्या ताेट्याची नाही. ही समाजाच्या ताेट्याची आहे. म्हणून आपण त्याकडे दुर्लक्ष करायची नाही. त्यांच्यावर कठाेरातील कठाेर कार्यदेशिर कारवाई करायची आहे. 

आपल्या खात्याची शिस्तीला अशाेभनीय अशा पद्धतीने असभ्य शब्द वापरणे, अशासकीय भाषा वापरणे, दाेन चार लाेकांनी मिळून त्याला लाठीने छडी मारणे असा प्रकार मात्र आपल्या हातून हाेता कामा नये. आपण एक गाेष्ट लक्षात घेतली पाहिजे. आपल्याकडून बेशिस्त वर्तन हाेत असेल तर आपली कुटुंबप्रमुख म्हणून त्याला पाठीशी घालणे हे आपल्या शिस्तीला शाेभणारे नाही. त्याच्यावरती मग मला कारवाई करणे आवश्यक हाेईल. परंतु आपण सर्व जण कष्टपुर्वक प्रयत्न करीत आहे. आपल्या काेणावर कारवाई व्हावी अशी माझी इच्छा नाही. परंतु काही ठिकाणहून तक्रारी येत आहेत मारहाण केल्याची तक्रार येत आहे. त्याची मी खात्री करीत आहे. ते जर खरे निघाले तर मला नाईलाजाने त्याच्यावर कारावाई देखील करावी लागले. परंतु माझी अशी अपेक्षा आहे की आपण माझ्या सूचनेप्रमाणे कार्यरत असताना आपण याेग्य ती कृती करावी. आपल्या मनात काेणतीही शंका राहू नये यासाठी मी माझ्या सहीनिशी पत्र बनविले आहे. त्यात सर्व अत्यावश्यक सेवा नमूद केल्या आहेत.   
याव्यतरिक्त तुमच्या समाेर एखादी व्यक्ती उभी राहिली मी पण अत्यावश्यक सेवेत आहे तर कृपया त्या व्यक्तीशी बाेलून घ्या. जाणून घ्या. आपल्याला लगेच कळते. मी तुम्हांला या संदेशाबराेबरच यादी पाठवित आहाेत. आपण स्वतःच्या काळजी घेणे आवश्यक आहे. त्याचबराेबर आपण आणि समाज आपल्याला एकमेकां विरुद्ध उभे नाही राहयाचे. आपल्याला एकमेकांसाेबत  उभे राहायचे आहे आणि हे युद्ध जिंकायचे आहे. मी तुमच्या साेबत आहे. आपण स्वतःची काळजी घ्या आणि कृपया लाेकांची काळजी घ्या असे ही सातपुते यांनी नमूद केले आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Superintendent Of Satara Police Tejaswi Satupte Adviced Colleagues To Be Carefull On Duty