विटा : ‘‘लोकप्रतिनिधी म्हणून मला आपला मतदारसंघ आदर्शवत करायचा आहे. मी कोणते चुकीचे काम सांगणार नाही आणि कोणतेही चुकीचे काम होऊ देणार नाही. पोलिसांनी अवैध धंद्यावर वचक ठेवावा,’’ असे आवाहन आमदार सुहास बाबर यांनी केले..Hammer on encroachments : अतिक्रमणांवर महापालिकेचा हातोडा; जुना पुना नाका ते अरविंद धाम मार्गावर धडक कारवाई.येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात आमदार म्हणून त्यांनी प्रथमच मतदासंघांतील सर्व शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची आज बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते. आमदार बाबर म्हणाले, ‘‘शासन आणि प्रशासन ही राज्यकारभाराची दोन चाके असतात. कारभार सुरळीत चालवायचा असेल तर या दोन्ही चाकांची दिशा एकच असली पाहिजे आणि शेवटच्या घटकाची उन्नती साधणे हे शासनाबरोबरच प्रशासनाचेही ध्येय असले पाहिजे. मतदारसंघातील लोकांच्या अपेक्षाही तितक्याच मोठ्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने सहकार्य करावे.’’.बाबर म्हणाले, ‘‘पंचायत समिती, जिल्हा परिषदेत पदाधिकारी म्हणून काम केले आहे. त्यामुळे मला प्रशासकीय कामांची माहिती आहे. आमदार म्हणून आपल्या मतदारसंघाच्या माझ्या विकासाच्या संकल्पना आहेत. त्या पूर्ण करण्यासाठी गतिमान व पारदर्शकपणे प्रशासनाने काम केले पाहिजे. तळमळीने काम करणाऱ्या प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पाठीशी राहीन. सामान्य लोकांना आपलेपणा वाटला पाहिजे असे काम झाले पाहिजे.आपल्याकडे आता पाणी आले आहे.’’.यावेळी प्रांताधिकारी विक्रम बांदल, पोलिस उपाधीक्षक विपुल पाटील यांच्यासह शासनाच्या सर्व खात्यांचे अधिकारी खानापूर, आटपाडी तालुक्याचे तहसीलदार, गटविकास अधिकारी, विटा, आटपाडी, खानापूर शहरांच्या पालिकांचे मुख्याधिकारी उपस्थित होते..MP Vishal Patil : सांगली शहरात ‘एआय डेटा लॅब’ देणार आहात? : खासदार विशाल पाटील .वाहनतळ आराखडा तयार करा‘‘विटा शहरात वाहनतळाची समस्या मोठी आहे. हा प्रश्न निकाली काढण्यासाठी पोलिस व पालिका प्रशासनाने आराखडा तयार करावा. आवश्यक त्या ठिकाणी सीसीटिव्ही कॅमेरे बसवावेत. पोलिसांनी अवैध धंद्यांवर वचक बसवावा,’’ अशा सूचनाही आमदार बाबर यांनी केल्या..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.