पोलिसाने दाखवला प्रामाणिकपणा आणि माणुसकी... 

अजित कुलकर्णी
Thursday, 10 September 2020

सांगली-  पोलिस अन माणुसकी हे समीकरण हल्ली बिघडत असताना एक प्रामाणिकपणा दर्शवणारी गोष्ट घडली. एटीएम मशीनच्या तांत्रिक बिघाडाने विसरलेले पैसे परत त्याच माणसाला देण्यात आले. उपचारासाठी सांगलीत आलेल्या एका कुटुुंबाला पोलिसांच्या चांगुलपणाचे दर्शन घडल्याने त्यांनी आभार मानले. 

सांगली-  पोलिस अन माणुसकी हे समीकरण हल्ली बिघडत असताना एक प्रामाणिकपणा दर्शवणारी गोष्ट घडली. एटीएम मशीनच्या तांत्रिक बिघाडाने विसरलेले पैसे परत त्याच माणसाला देण्यात आले. उपचारासाठी सांगलीत आलेल्या एका कुटुुंबाला पोलिसांच्या चांगुलपणाचे दर्शन घडल्याने त्यांनी आभार मानले. 

बजरंग भानुदास लेंडले (रा. हलदहिवडी, जि. सोलापूर) हे कोरोनाच्या उपचारासाठी 1 सप्टेंबर रोजी सांगलीत आले होते. सेवेला मुलगी कांचन व जावई अजित सदाशिव चव्हाण हे होते. रुग्ण गंभीर अवस्थेत असल्याने घरच्यांना साहजिकच घोर लागलेला. उपचारासाठी पैसे लागणार म्हणून सिव्हिल चौकातील बॅंक ऑफ इंडियाच्या एटीएममधून काढताना गडबड झाली. मशीनमध्ये तांत्रिक बिघाड असल्याने पैसे निघणार नाहीत म्हणून ते माघारी फिरले. थोड्या वेळाने एटीएममध्ये आलेल्या अविनाश भांडवले (रा. कार्लेकर गल्ली, खणभाग) यांना मशीनमधून बाहेर आलेले पैसे व स्लिप दिसली. त्यांनी लागलीच शहर पोलिस ठाण्यात दूरध्वनीवरुन ही घटना सांगताच सहायक पोलिस निरीक्षक निलेश बागाव, पोलिस हवालदार अनंत होळकर यांच्यासह अन्य घटनास्थळी दाखल झाले. 

मशीनमधून बाहेर आलेले 10 हजार रुपये होळकर यांनी ताब्यात घेतले. मात्र ते कुणाचे याचा स्लिपवरुन शोध सुरु झाला. येथील पटेल चौकातील बॅंक ऑफ इंडियाशी पत्रव्यवहार केला. तब्बल एक आठवड्यानंतर ते एटीएम कार्ड बजरंग लेंडवे यांचे असून ते स्टेट बॅंक ऑफ इंडियाचे खातेदार असल्याचे समजले. हवालदार होळकर यांनी चौकशी करुन लेंडवे यांच्या खात्यावर 10 हजार रुपये भरत अडचणीत असलेल्या कुटुंबियांना दिलासा दिला. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The police showed honesty and humanity