...अन्‌ बलात्कारी सापडला जाळ्यात

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 डिसेंबर 2019

तो प्रतीक लॉज येथे रिक्षातून उतरला. त्या वेळी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याच्यावर यापूर्वीही त्याच्यावर बलात्कार व मारामारीचे गुन्हे दाखल झाल्याची माहिती समाेर आली आहे.

सातारा  : दहिवडी परिसरातील हॉटेलवर राहणाऱ्या महिलेवर दारूच्या नशेत बलात्कार करून जीवे मारण्याची धमकी देत संशयित पसार झाले होते. त्यातील तुषार भोसले हा संशयित साताऱ्यातील लॉजवर येणार असल्याची माहिती मिळताच त्याला सापळा रचून पोलिसांनी ताब्यात घेतले.

हेही वाचा - बाळासाहेबांच्या मुलाने शब्द फिरविला 
 
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की एक विवाहित महिला दहिवडी परिसरातील हॉटेलमध्ये राहण्यास होती. ती एकटी असताना तुषार भोसले, त्याचा मामा भरत सस्ते व भाऊ शहाजी भोसले या तिघांनी दारू पिऊन पीडित महिलेवर बलात्कार केला, तसेच त्याचे व्हिडिओ शूटिंग केले. त्या महिलेने पोलिस ठाण्यात तक्रार करणार असल्याचे सांगितल्याने संशयितांनी तिला हाताने व काठीने मारहाण केली. जिवे मारण्याची धमकीही दिली.

हेही वाचा - पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुतेंवर कारवाई ?

महिलेच्या तक्रारीवरून दहिवडी (ता. माण) पोलिस ठाण्यात ता. 14 रोजी गुन्हा नोंद करण्यात आला. संशयित तुषार मालोजी भोसले (वय 26, रा. गोंदवले) हा येथील पोवई नाक्‍यावरील प्रतीक लॉज येथे येणार असल्याची माहिती सातारा शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांना मिळाली. श्री. मांजरे यांनी तात्काळ डीबी पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सूचना देऊन प्रतीक लॉज येथे सापळा लावला.

अवश्य वाचा - कासची उंची महाविकासच्या हाती ; हवा 60 कोटी निधी

तो प्रतीक लॉज येथे रिक्षातून उतरला. त्या वेळी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याच्यावर यापूर्वीही दहिवडी पोलिस ठाण्यात बलात्कार व मारामारीचे गुन्हे दाखल आहेत. तुषार भोसले याला पुढील तपासासाठी दहिवडी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
 
गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलिस उपनिरीक्षक एन. एस. कदम, सहायक पोलिस उपनिरीक्षक डी. वाय. कदम, नाईक शिवाजी भिसे, कॉन्स्टेबल धीरज कुंभार, किशोर तारळकर, अभय साबळे, गणेश घाडगे, गणेश भोंग, संतोष कचरे, विशाल धुमाळ यांनी ही कारवाई केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police Trap Succeded To Caught Rapist