esakal | बाळासाहेबांच्या मुलाने शब्द फिरविला : पंजाबराव पाटील
sakal

बोलून बातमी शोधा

बाळासाहेबांच्या मुलाने शब्द फिरविला : पंजाबराव पाटील

कर्ज बुडवा शेतकरी वाचवा, हे आंदोलन राज्यभर सुरू होईल. या आंदोलनाचा समारोप मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर होईल असा इशारा पाटील यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिला आहे.

बाळासाहेबांच्या मुलाने शब्द फिरविला : पंजाबराव पाटील

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सातारा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याचे जाहीर केले होते. मात्र, प्रत्यक्षात त्यांनी केवळ थकबाकीदारांनाच माफी जाहीर केली आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे शब्दाचे पक्के होते. मात्र, त्यांचा मुलगा उद्धव ठाकरे यांनी कर्जमाफीबाबत शब्द फिरवून शेतकऱ्यांचा अपमान केला आहे.

हेही वाचा - कर्‍हाड पोलिस लय धडाकेबाज... मोक्काचे अर्धशतक 

येत्या आठ दिवसांत मुख्यमंत्र्यांनी शब्द बदलून सरसकट कर्जमाफी असे जाहीर करावे, अन्यथा बळिराजा शेतकरी संघटना राज्यभर "कर्ज बुडवा शेतकरी वाचवा...' हे आंदोलन करतील, असा इशारा बळिराजा शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी दिला.
 
शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी बोलताना पंजाबराव पाटील म्हणाले, की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळावा. कर्जमाफीची घोषणा करताना त्यांनी 30 सप्टेंबरपर्यंत थकीत कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय घेताना त्यांनी शब्द फिरविला आहे. मुळात शेतीसाठी लागणाऱ्या कर्जाचा समावेश माफीत होणे गरजेचे असताना केवळ थकीत पीक कर्जाचा समावेश केला आहे. मुळात पीक कर्ज हे प्रत्येक वर्षी दहा ते 15 टक्‍क्‍याने वाढवून मिळते. सोसायटीचा सचिव आणि अध्यक्षांच्या मदतीने पीक कर्ज वाढवून घेतले जाते. या वाढीव दहा टक्के कर्जातून शेतकरी आपली मागील कर्जाची परतफेड करतो.

जरुर वाचा - खुषखबर...नियमित कर्जदारांना मिळणार दुप्पट लाभ !

त्यामुळे वीस हजार रुपये पीककर्ज मिळणाऱ्या शेतकऱ्यांचा कर्जाचा आकडा दीड लाखांवर गेला आहे. मुळात पीक कर्जाऐवजी शेतीपूरक व्यवसायासाठी घेतलेल्या कर्जाची थकबाकीचा आकडा अधिक आहे. त्यामुळे शेतीपूरक व्यवसायाच्या कर्जाचा माफीत समावेश करणे गरजेचे आहे. मुख्यमंत्र्यांनी येत्या आठ दिवसांत सरसकट कर्जमाफी असा शब्द प्रयोग करावा. शेतकरी संघटनेने केलेली ही मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मान्य करून शब्द बदलतील, अशी आशा शेतकऱ्यांना आहे.

कर्ज बुडवा शेतकरी वाचवा

एक जानेवारीपर्यंत हा बदल केला नाही तर कऱ्हाडमधील यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीला अभिवादन करून आंदोलनास सुरवात होईल. कर्ज बुडवा शेतकरी वाचवा, हे आंदोलन राज्यभर सुरू होईल. या आंदोलनाचा समारोप मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
 
या वेळी बळिराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला, उपाध्यक्ष सुनील कोळी, उत्तम खबाले, युवा आघाडी जिल्हाध्यक्ष विश्‍वास जाधव, कऱ्हाड तालुका कार्याध्यक्ष नसीर पटेल, आण्णा शेंडगे, तसेच रयत क्रांती संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. 

loading image