इथे गरिबांना पाच हजार कीट वाटणार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 एप्रिल 2020

कोरोनामुळे संकटात सापडलेल्या सांगली जिल्ह्यातील रोजंदारीवरील मजूर, निराधार, ऊसतोड मजूर, भटके, परराज्यातील मजूर, ज्यांच्याकडे रेशनकार्ड उपलब्ध नाही अशांना मदतीसाठी जिल्ह्यात 11 जीवनावश्‍यक वस्तुंच्या 5 हजार कीटच्या वितरणाद्वारे मदत करण्यात आले आहे,

सांगली : कोरोनामुळे संकटात सापडलेल्या जिल्ह्यातील रोजंदारीवरील मजूर, निराधार, ऊसतोड मजूर, भटके, परराज्यातील मजूर, ज्यांच्याकडे रेशनकार्ड उपलब्ध नाही अशांना मदतीसाठी जिल्ह्यात 11 जीवनावश्‍यक वस्तुंच्या 5 हजार कीटच्या वितरणाद्वारे 20 हजार गरजवंताना जिल्हा प्रशासनामार्फत स्वयंसेवी संस्थाच्या माध्यमातून मदतीचे नियोजन करण्यात आले आहे, आजअखेर 1 हजार 775 कीटचे वितरण करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी आज दिली.

मदत संकलनाचे व वितरणाचे नियोजन अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे, जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे, उपजिल्हाधिकारी विजय देशमुख, तहसीलदार (पुरवठा) शिल्पा ओसवाल यांची टीम करत आहे. 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाऊनमुळे हातावरचे पोट असणाऱ्या लोकांची जेवणाची सोय व्हावी यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. अशा लोकांना मदत करण्यासाठी अनेक दानशूर व्यक्ती, सामाजिक संस्था, व्यापारी संस्था आदिंना मदतीसाठी आवाहन करण्यात आले असून जिल्हास्तरावर मदत स्वीकृती केंद्र स्थापन करण्यात आले आहे. या माध्यमातून करण्यात आलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत सकल जैन समाज सांगली, राधेकृष्ण एक्‍सस्टेशन प्रा. लि., इंडियन रेडक्रॉस सोसायटी, हेमंत महाबळ, मनोहर हनुमानबगस सारडा यांनी जीवनावश्‍यक वस्तुंचे कीट प्रशासनाला दिले आहेत. प्रत्येक कीटमध्ये 4 व्यक्तींच्या कुटुंबाला 10 दिवस पुरेल एवढ्या जीवनावश्‍यक वस्तुंचा समावेश आहे.

यामध्ये गव्हाचे पीठ, तांदूळ, साखर, चहा पावडर, तिखट, मीठ, तेल, डाळी, साबण यासह सुमारे 11 जीवनावश्‍यक वस्तुंचा समावेश आहे. सुमारे 750 रुपये किमतीच्या या कीटची पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते सोमवारपासून वितरणाची सुरवात झाली आहे. पाच हजार कीटच्या माध्यमातून 20 हजार गरजू व्यक्तींपर्यंत मदत पोहोचवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. 

येथे संपर्क साधावा 
जिल्हास्तरीय मदत स्वीकृती केंद्र ः- दूरध्वनी क्र. 0233-2600500, मोबाईल क्रमांक 8208689681, टोल फ्री क्रमांक 1077, तालुका नियंत्रण कक्ष मिरज 0233-2222682, शिराळा 02345-272137, 9922447812, 9359807492, वाळवा 02342-222250, 9423335135, 7350202617, पलूस 02346-226888, 9403683444, 7387654331, कडेगाव 02347-243122, 8275917674, 7972947452, तासगाव 02346-250630, 8482876900, कवठेमहांकाळ 02341-222039, 9823541428, 9834618823, खानापूर 02347-272626, आटपाडी 02343-221624, 7387437462, जत 02344-246234, 9763287777. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The poor will get five thousand kit in Sangali