पोपटराव पवार म्हणतात, छत्रपतींच्या जलनीती, वननीतीमुळेच पाण्याबाबत काम करता आले 

Popatrao Pawar says, Due to Chhatrapati's policies and strategies, water work was done
Popatrao Pawar says, Due to Chhatrapati's policies and strategies, water work was done

नगर: ""छत्रपती शिवाजी महाराज यांची जलनीती व वननीती जगासाठी आदर्श आहे. पर्यावरणाचे संवर्धन, शेतकरी व रयतेच्या हिताच्या कामांना महाराजांनी प्राधान्य दिले. अलीकडे वेगाने होणारी पर्यावरणाची हानी आणि ग्लोबल वॉर्मिंगचे दुष्परिणाम यांपासून वाचायचे असेल, तर पुन्हा एकदा शिवरायांची जलनीती व वननीती समजून घ्यावी लागेल,'' असे मत राज्याच्या आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी व्यक्त केले. 


शहरातील भिस्तबाग चौक येथे शिवप्रहार संघटनेतर्फे संस्थापक अध्यक्ष संजीव भोर यांच्या पुढाकाराने शिवजयंतीनिमित्त आयोजित उत्सवात पवार बोलत होते.

पवार यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल "शिवप्रहार'तर्फे त्यांचा विशेष गौरव करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांची आकर्षक प्रतिमा, झाडाचे रोप व वैचारिक ग्रंथ भेट देऊन सत्कार करण्यात आला. आमदार संग्राम जगताप, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, दादा कळमकर यांच्यासह नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 


शिवशाहीर सुरेश जाधव व सहकाऱ्यांनी सादर केलेला पोवाडा व शिवस्फूर्तिगीतांनी नगरकरांची मने जिंकली. आमदार जगताप, फाळके, कळमकर आदींनी मनोगत व्यक्त केले. संजीव भोर यांनी प्रास्ताविक केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com