esakal | आता शिक्षकांनाही असणार वर्क फ्रॉम होम ; 'या' राज्यात सुरू आहे तयारी
sakal

बोलून बातमी शोधा

possibility of teachers work from home decision increses for belgoan govrnment

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने अनेक पालकांनी लवकर शाळा सुरु करण्यास विरोध दर्शविला.

आता शिक्षकांनाही असणार वर्क फ्रॉम होम ; 'या' राज्यात सुरू आहे तयारी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याने शाळा 31 ऑगस्टपर्यंत बंद राहणार आहेत. त्यामुळे ऑगस्ट महिन्यामध्येही शिक्षकांना वर्क फ्रॉम होमची परवानगी मिळण्याची शक्‍यता आहे. याबाबत लवकरच निर्णय होणार असून याकडे शिक्षकांचे लक्ष लागून राहिले आहे.

हेही वाचा - कोल्हापूरच्या उपनगरांतील गुन्हेगारीला आता बसणार आळा ...

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने अनेक पालकांनी लवकर शाळा सुरु करण्यास विरोध दर्शविला. शिक्षण खात्याने घेतलेल्या पालकांच्या बैठकीत विजयादशमी म्हणजेच दसरा झाल्यानंतर शाळा सुरु करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. सध्याची परिस्थिती पाहता लवकर शाळा सुरु होणार नसल्याचे स्पष्ट आहे. दरम्यान शिक्षण खात्याने शाळा सुरु करण्याबाबत पूर्वतयारीसाठी जुलै महिन्यात शिक्षकांना हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र सुरक्षेचा उपाय म्हणून रोज शाळेला हजर होणाऱ्या शिक्षकांना वर्क फ्रॉम होमची परवानगी देण्यात आली. आता या महिन्यातही पुन्हा शिक्षकांना वर्क फ्रॉम होमची परवानगी मिळण्याची शक्‍यता आहे. त्यानुसार दोन दिवसांत शिक्षकांना तसा आदेश मिळण्याची शक्यता वर्तवली आहे. 

हेही वाचा - देशातील पहिले मानवनिर्मित अभयारण्य यंदा पर्यटकांविना ओस...

ऑगस्ट महिन्यात शाळा बंद राहणार असल्या तरी विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण उपलब्ध करुन देण्यासाठी शिक्षकांनी तयारी करावी, तसेच शाळांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरु करावी, अशी माहिती देण्यात आली. त्यामुळे वर्क फ्रॉम होमचा आदेश आला तरी शिक्षकांना काही दिवस शाळेत हजर राहावे लागणार असून शाळेत स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे घालून देण्यात आली आहेत.

संपादन - स्नेहल कदम