विद्यार्थ्यांनो प्रवेश प्रक्रियेसंदर्भात 'ही' आहे महत्वाची सुचना

सतीश जाधव
Sunday, 23 August 2020

विद्यापीठाने तिसऱ्या सेमिस्टरच्या प्रवेश प्रक्रियेची तारीख जाहीर केली आहे

बेळगाव : राणी चन्नम्मा विद्यापीठातील (आरसीयू) पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या तिसऱ्या सेमिस्टरच्या प्रवेश प्रक्रियेला सोमवार पासून सुरुवात होणार आहे. तर 8 सप्टेंबरपासून नियमित वर्गांना प्रारंभ होईल. यासंबंधी विद्यापीठाने पत्रक जारी केले आहे. कोरोनामुळे 24 मार्चपासून विद्यापीठ आणि महाविद्यालये बंदच आहेत. अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा वगळता इतर सर्व परीक्षा सरकारने रद्द केल्या आहेत. 

हेही वाचा - शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ, एकीकडे कोरोना अन् दुसरीकडे `ही` समस्या...

पाच महिने झाले असले तरी विद्यापीठ अजून बंदच आहे. मात्र, विद्यापीठाने तिसऱ्या सेमिस्टरच्या प्रवेश प्रक्रियेची तारीख जाहीर केली आहे. विद्यार्थ्यांना दंडाव्यतिरिक्त 24 ऑगस्ट ते 2 सप्टेंबरपर्यंत प्रवेश घेता येणार आहे. तसेच 3 सप्टेंबर ते 7 सप्टेंबरपर्यंत प्रवेश घेतल्यास 500 रुपये दंडा आकारला जाणार आहे. विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी विद्यापीठाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. 

विद्यापीठात पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या वेगवेगळ्या विभागांसाठी शुल्क निश्‍चित करण्यात आले. अर्थशास्त्र आणि लायब्ररी ऍण्ड इन्फॉर्मेशन सायन्स-सामान्य वर्गासाठी 10,050 रुपये, ओबीसीसाठी (1 लाखापेक्षा कमी उत्पन्न) 6,090 रुपये, अनुसूचित जाती-जमाती, प्रवर्ग-1 साठी (अडीच लाखांपेक्षा कमी उत्पन्न) 4,030 रुपये शुल्क आहे. मराठी, कन्नड व इंग्रजीत सामान्यांसाठी 7,050 रुपये, ओबीसीसाठी (1 लाखापेक्षा कमी उत्पन्न) 4,290 रुपये, अनुसूचित जाती-जमाती, प्रवर्ग-1 साठी (अडीच लाखांपेक्षा कमी उत्पन्न) 3,130 रुपये शुल्क आहे. 

हेही वाचा - कला महाविद्यालये बंद पडण्याचा धोका ? 

गणित, भूगोल, पदार्थविज्ञान, रसायनशास्त्र, बॉटनीकरिता सामान्यांसाठी 9,450 रुपये, ओबीसीसाठी (1 लाखापेक्षा कमी उत्पन्न) 4,290 रुपये, अनुसूचित जाती-जमाती, प्रवर्ग-1 साठी (अडीच लाखांपेक्षा कमी उत्पन्न) 3,130 रुपये शुल्क आहे. 
एमएसडब्ल्यू, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास, पत्रकारिता, मास कम्युनिकेशन, क्रिमिनॉलॉजी ऍण्ड क्रिमिकल जस्टीस अभ्यासक्रमाकरिता सामान्यांसाठी 8,250 रुपये, ओबीसीसाठी (1 लाखापेक्षा कमी उत्पन्न) 4,290 रुपये, अनुसूचित जाती-जमाती, प्रवर्ग-1 साठी (अडीच लाखांपेक्षा कमी उत्पन्न) 3,130 रुपये शुल्क आहे. एमकॉम, एमएड, एमपीएड अभ्यासक्रमाकरिता सामान्यांसाठी 13,650 रुपये, ओबीसीसाठी (1 लाखापेक्षा कमी उत्पन्न) 6,090 रुपये, अनुसूचित जाती-जमाती, प्रवर्ग-1 साठी (अडीच लाखांपेक्षा कमी उत्पन्न) 4,030 रुपये शुल्क आहे. एमएससी कॉम्प्युटर सायन्स अभ्यासक्रमाकरिता सामान्यांसाठी 22,370 रुपये, ओबीसीसाठी (1 लाखांपेक्षा कमी उत्पन्न) 10,370 रुपये, अनुसूचित जाती-जमाती, प्रवर्ग-1 साठी (अडीच लाखांपेक्षा कमी उत्पन्न) 5,910 रुपये शुल्क असणार आहे.

संपादन - स्नेहल कदम


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: post graduation admission process will start from 22 august in belgaum university