पोल्ट्री व्यवसाय संकटात ; अंडी खरेदीकडे व्यापाऱ्यांची पाठ

सचिन निकम
सोमवार, 6 एप्रिल 2020

उन्हाच्या तडाख्याने अंडी नासून नुकसान होत आहे. अंडी साठवण्यासाठी ट्रे कमी पडू लागल्याने अंड्याचे ढीग लावून साठवले जात आहेत. यामुळे पोल्ट्री व्यावसायिक पुरते संकटात सापडले आहेत.  

लेंगरे (जि. सांगील) : कोरोनाच्या वाढत्या प्रार्दुभावमुळे पोल्ट्री व्यावसियाकांचे कंबरडे मोडले आहे. कोरोनाच्या भीतीने पोल्ट्री व्यापाऱ्यांनी अंडी खरेदीकडे पाठ फिरवली आहे. उन्हाच्या तडाख्याने अंडी नासून नुकसान होत आहे. अंडी साठवण्यासाठी ट्रे कमी पडू लागल्याने अंड्याचे ढीग लावून साठवले जात आहेत. यामुळे पोल्ट्री व्यावसायिक पुरते संकटात सापडले आहेत. पोल्ट्रीचे पक्षांधा लागणारे खाद्यांचा तुटवडा निर्माण झाल्याने पक्षीच पक्षाचे लचके तोडू लागले आहेत.  

लेंगरे परिसरासह तालुक्यात सुमारे 18 लाख लेअर कोंबड्या पासून 15 लाख अंड्याचे उत्पादन घेतले जाते. ही अंडी पुणे, मुंबईसह कोकणातील व्यापारी खरेदी करतात. परंतु बाजारपेठ अंड्याची मागणीच कमी झाल्याने गेल्या आठ दिवसापासून अंडी व्यापाऱ्यांनी खरेदी पुर्णपणे बंद केली आहे. अपवादाने एकदा एखादा व्यापारी  एक रुपयांना एक अंडी खरेदी करत आहे. त्याला मागणी नसल्याने अंडी पडून आहेत. अंडी साठवण्यासाठी पोल्ट्री व्यवसायिकांडे असणारे ट्रे कमी पडू लागले आहेत. अंड्याचे ट्रे लावण्याण्यासाठी जागा नसल्याने अंड्याचे जमीनीवर ढीग लावण्याची वेळ पोल्ट्री व्यवसायिकांवर आली आहे. उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असल्याने कोंबड्यांची मर होत आहे. पोल्ट्री व्यवसायाची अशी अवस्था किती दिवस राहणार आहे. अशी चिंत्ता व्यावसायिकांना सतावत आहे. अंडी विक्री थांबली आहे. परंतु अंडी उत्पादनाचा खर्च मात्र सुरू  आहे. व्यवसायिकांना लागणारा कच्चामाल पुरवणाऱ्या व्यापाऱ्यांनी व्यवसायाची बिकट अवस्था बघून उधारी बंद केली आहे. उत्पादन खर्च साडेतीन रुपये आहे. या खर्चाचा मेळ कसा घालायचा असा प्रश्न व्यवसायिकांनी पडला आहे. बँकां देखील आर्थिक मदत करण्यास नकार देत आहेत. व्यवसायात लाखो रुपयांचे नुकसान सुरू आहे. 

दरम्यान, एक दिवसाच्या पिकांच्या पिल्लाचे बुकिंग थांबले आहे. पैसे भरून अगोदर बुकिंग केलेल्या पोल्ट्री व्यवसायिकांना पक्षी नेण्याचा आग्रह उत्पादक कंपन्या करत आहेत. लाॅकडाऊनमुळे कच्च्या मालाचा पुरवठा थांबला. त्यामुळे लाखो पक्षी सांभाळायचे कसे हा प्रश्न आहे. पक्षांना खाद्य कमी पडल्यास पिंजऱ्यातील इतर पक्षांचे पक्षी लचके तोडू लागले आहेत. या सर्व संकटासमोर व्यावसायिक पुरते हतबल झाले आहेत.

पालकमंत्री जयंत पाटील, आमदार अनिल बाबर यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या आढावा बैठकीत पोल्ट्री व्यावसायांच्या परिस्थिती बद्दल चर्चा करण्यात आली. शासनाकडून सर्वोत्तोपरी या पोल्ट्री व्यवसायाला उभारी देण्यासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले. मात्र मदत कधी मिळणार असा सवाल उपस्थित केला जात आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Poultry business in crisis