प्रकाश हॉस्पिटल गोरगरीब रूग्णांसाठी आधार : चंद्रकांतदादा पाटील....कोविड सेंटरचे उद्‌घाटन 

PRAKASH HOSPITAL.jpg
PRAKASH HOSPITAL.jpg
Updated on

इस्लामपूर (सांगली)- आजची आरोग्य उपचार पध्दत ही सर्वसामान्य जनतेला न परवडणारी व आर्थिक वेदना सहन न होणारी आहे. या परिस्थितीत सेवाभाव जपत प्रकाश हॉस्पिटल हे गोरगरीब रूग्णांसाठी आधार बनले आहे. अनेक रूग्णांच्या आर्थिक वेदनेची जाणीव ठेवून शारिरीक वेदना दूर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न प्रकाश हॉस्पिटल प्रशासन करत आहे, असे मत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष, आमदार चंद्रकांत पाटील यांनी येथे व्यक्त केले. 

प्रकाश शिक्षण मंडळ संचलित प्रकाश हॉस्पिटल ऍण्ड रिसर्च सेंटर मध्ये सुरू करण्यात आलेल्या कोविड तपासणी व उपचार केंद्र उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले, ""कोरोनासारख्या अदृष्य विषाणूने संपुर्ण जगाचे वेळापत्रक कोलमडले आहे. सर्व स्तरातील घटकावरील जीवनावर परिणाम झाला आहे. सरकार व प्रशासन यांच्यावरील ताण वाढत चालल्याने खासगी हॉस्पिटलचा त्यांना आधार घ्यावा लागत आहे. कोरोनाचे संकट हे संपुर्ण देशावर आले असले तरी प्रत्येकाने या लढाईत देशसेवक म्हणून उतरले पाहीजे. प्रत्येकाने स्वयंशिस्त पाळली पाहीजे, या लढाईत आपण निश्‍चित विजयी होऊ. भाजपा पक्षाने, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने या लढाईसाठी विविध मास्टर प्लॅन बनविले आहेत. काही धारावीसारखे प्लॅन यशस्वीही केले आहेत.

ही लढाई देशसेवक म्हणून आम्ही लढत आहोत, तसे प्रत्येकाने लढले पाहिजे. आज कोरोनाच्या लढाईत शासन व प्रशासनाच्या हाकेला प्रतिसाद देत कोविड सेंटर सुरु करण्याचा निर्णय निशिकांतदादांनी समाजहीत व सेवाभाव जपला आहे. निशिकांतदादा हे स्वच्छ व निर्मळ मनाचे व्यक्तीमत्व असुन त्यांच्या कर्तृत्वात व विचारात सेवाभाव आहे. त्यांनी शिक्षण व आरोग्यसारख्या पवित्र क्षेत्रात मोठे काम उभे केले आहे.'' 

प्रकाश हॉस्पिटलचे संस्थापक व नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ.अभिमन्यु पाटील यांनी उपलब्ध सुविधांची माहिती दिली. यावेळी प्रकाश शिक्षण मंडळाचे अध्यक्ष संजय जाधव, माजी आमदार भगवानराव सांळुखे, प्रसाद पाटील, भाजप शहराध्यक्ष अशोकराव खोत, मधुकर हुबाले, संघटन सरचिटणीस धैर्यशील मोरे, चंद्रकांत पाटील, प्रविण माने, संदीप सावंत, संजय हवलदार, यदुराज थोरात, गजानन पाटील, विश्वजीत पाटील, रोहीत चिवटे, विपुन कुलकर्णी, निशिकांत शेटे, वाहीद मुजावर, सागर जाधव आदी उपस्थित होते. 
 

संपादन : घनशाम नवाथे 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com