तर मी बेळगाव लोकसभा पोटनिवडणूक लढविण्यास इच्छुक : प्रकाश हुक्केरी

सकाळ वृत्तसेवा
Monday, 26 October 2020

आपण ज्या पक्षाकडून उमेदवारी मिळेल, त्या पक्षाकडून बेळगाव लोकसभेची निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे मत माजी खासदार प्रकाश हुक्केरी यांनी काल व्यक्त केले.

चिक्कोडी (बेळगाव) : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे व आपले कौटुंबीक आणि जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांच्या निधनामुळे आपल्याला अतीव दुःख झाले आहे. त्यांच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीला भाजपाने पोटनिवडणुकीत उमेदवारी दिली, तर त्याच्या विजयासाठी मी सर्वस्व पणाला लावून प्रयत्न करणार आहे. असे करताना काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी माझ्यावर काहीही कारवाई केली तरी त्याची मला पर्वा नाही. अंगडी यांच्या कुटुंबाव्यतिरिक्त कोणालाही उमेदवारी देण्याचा प्रयत्न झाला तर आपण ज्या पक्षाकडून उमेदवारी मिळेल, त्या पक्षाकडून बेळगाव लोकसभेची निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे मत माजी खासदार प्रकाश हुक्केरी यांनी काल व्यक्त केले. केरूर (ता. चिक्कोडी) फाट्यानजीक  नव्याने सुरू केलेल्या पेट्रोल पंपाच्या उद्घाटन समारंभावेळी ते बोलत होते. 

हेही वाचा -  शेतात पाणी हाय म्हणून रस्त्यावर मळणी काढलीया -

ते म्हणाले, आपण प्रथम खासदार होऊन गेल्यानंतर तेथे दिल्लीतील सर्व माहिती सुरेश अंगडी यांच्याकडून मला मिळाली. तसेच पंतप्रधान कार्यालयात पोहचवण्यापर्यंत विकासकामे करण्यासाठी हातभार लावला. त्यामुळे उपकाराची परतफेड म्हणून त्यांच्या कुटुंबातील कोणालाही उमेदवारी मिळाल्यास माझ्या मुलाला निवडणूक विजयी केली त्याचपद्धतीने यश त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीला विजय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. जर भाजपाने त्यांच्या कुटुंबातील कोणालाही उमेदवारी दिली नाही, किंवा इतर कोणत्याही पक्षांनी आपल्याला उमेदवारी दिल्यास आपण ती निवडणूक लढविण्यास सज्ज आहोत. 

काँग्रेस, भाजपने उमेदवारी दिली तरी ती स्वीकारण्यास मी तयार आहे. 2005 साली जिल्हा पालक मंत्री असताना त्या भागातील विकासकामे केली आहेत. बेळगाव येथे बिम्स वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करून आणण्यासाठी आपणास केंद्रीय मंत्री सुरेश अंगडी यांची मोलाची मिळाली होती. राज्यातील काँग्रेस नेते केवळ दिखावा करून दिवस काढत आहेत. राज्यातील भाजप सरकारने सर्व विधानसभा मतदारसंघातील विकासकामांचा निधी अडवून ठेवला आहे. निधी देण्यासाठी राज्य सरकारला जाब विचारायचा सोडून राज्यातील काँग्रेस पक्षश्रेष्ठी वेळकाढूपणाचे काम करीत आहेत, अशीही खंत त्यांनी व्यक्त केली. 

हेही वाचा - स्टुडिओला लागलेल्या आगीत ५ लाखाचे नुकसान -

चिक्कोडी-सदलगा विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी वाढीव निधी देण्याचे भाजपाने आमीश दिल्यास काय करणार, या प्रश्नावर ते म्हणाले, 'त्यांनी आजवर तशी ऑफर दिलेली मात्र दिली तरी त्याचा विचार करावा लागेल. तसेच बेळगाव येथील खासदारकीच्या पोटनिवडणुकीत आपल्याला जर काँग्रेसने किंवा भाजपने उमेदवारी दिली तरी आपण ती निवडणूक लढविण्यास उत्सुक आहोत. मग पक्षश्रेष्ठींनी कारवाई केली तरी मला त्याची पर्वा असणार नाही.' 

 

संपादन - स्नेहल कदम 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: prakash hukkeri aspirants of a parliament in belgaum with any party to wish for election