विधान परिषद : हुक्केरी, संक यांचा उमेदवारी अर्ज दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Prakash Hukkeri Sunil Sank nomination for Karnataka Northwest Teachers Constituency of Legislative Council belgaum

विधान परिषद : हुक्केरी, संक यांचा उमेदवारी अर्ज दाखल

बेळगाव : कॉंग्रेसचे माजी खासदार प्रकाश हुक्केरी यांनी आज (ता.२५) विधान परिषदेच्या कर्नाटक वायव्य शिक्षक मतदार संघासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. पदवीधर मतदार संघासाठी ॲड. सुनील संक यांनी अर्ज दाखल केला. यावेळी केपीसीसी अध्यक्ष डी. के. शिवकुमार, माजी मंत्री एम. बी. पाटील उपस्थित होते. कॉंग्रेस पक्षातर्फे गेल्या आठवड्यामध्ये उमेदवारी यादी जाहीर करण्यात आली होती. यात श्री हुक्केरी व श्री संक यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती.

त्यानुसार दोन्ही उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. भाजपने पदवीधर मतदार संघासाठी हणमंत निराणी आणि शिक्षक मतदार संघासाठी अरुण शहापूर यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यासोबत कॉंग्रेस पक्षानेही तुल्यबळ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे. यामुळे ही लढत चुरशीची असणार आहे. पदवीधर आणि शिक्षक मतदार संघासाठी १३ जूनला मतदान होणार आहे. दोन्ही मतदार संघ मिळून ७ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. त्यात आता चौघांची भर पडली आहे. एकूण अर्जांची संख्या ११ झाली आहे.

यावेळी केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी, माजी मंत्री ईश्वर खंड्रे, आमदार लक्ष्मी हेब्बाळकर, आमदार डॉ. अंजली निंबाळकर, आमदार महांतेश कौजलगी, आमदार गणेश हुक्केरी, आमदार चन्नराज हट्टीहोळीसह पदाधिकारी उपस्थित होते.

अर्जासाठी इच्छूकांची लगबग

विधान परिषदेसाठी उद्या (ता.२६) उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अंतिम दिवस आहे. यामुळे अर्ज दाखलसाठी इच्छूकांची लगबग सुरु आहे. याचाच भाग म्हणून वायव्य पदवीधर मतदार संघासाठी बी. संपी, राघवेंद्र कोकटनूर, शिवणगौड बसणगौड गौडर, बसवराज शांतवीर कब्बीन, आदर्शकुमार पुजार, राजनगौडा पाटील आदींनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहे.

Web Title: Prakash Hukkeri Sunil Sank Nomination For Karnataka Northwest Teachers Constituency Of Legislative Council Belgaum

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top