Praniti Shinde Claims Dhananjay Munde Will Become Minister Again After Six Months : संतोष देशमुख हत्या प्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांनी अखेर त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर आता सर्व स्तरातून विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. अशातच काँग्रेस नेत्या प्रणिती शिंदे यांनीही मोठा दावा केला आहे. धनंजय मुंडे सहा महिन्यानंतर परत मंत्री होतील, असं त्या म्हणाल्या. प्रणिती शिंदेंच्या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांनाही उधाण आलं आहे. सोलापुरात माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात भाष्य केलं.