प्रो कबड्डीत कोल्हापूरच्या प्रसादचा ‘आवाज’

प्रो कबड्डीत कोल्हापूरच्या प्रसादचा ‘आवाज’

कोल्हापूर - मुंबईतील प्रो कबड्डीच्या मैदानात कोल्हापूरच्या प्रसादचा ‘आवाज’ घुमतोय. महाडिक वसाहतीतील या ‘क्‍यूट’ अँकरचा प्रवास हेवा वाटावा असा ‘नाट्यमय’ आहे. 
महाडिक वसाहतीतील दत्त मंदिराच्या पाठीमागे प्रसादचे वडील प्रशांत क्षीरसागर यांचे किराणा मालाचे दुकान आहे. त्यांचा हा मोठा मुलगा. त्याचे दहावीपर्यंतचे शिक्षण मुक्त सैनिक वसाहतमधील शां. कृ. पंत वालावलकर शाळेत झाले. नंतर त्याने अकरावी सायन्ससाठी पुण्यात गरवारे कॉलेजला ॲडमिशन घेतले.

तेथे त्याला नाटकांची आवड लागली. त्यातून सूत्रसंचालन (अँकरिंग) करू लागला. हा त्याच्या पुढच्या करिअरचा ‘टर्निंग’ पॉइंट  ठरला. बारावीला अपेक्षित गुण मिळाले नाहीत, म्हणून वडिलांनी त्याला परत कोल्हापूरला आणले. पण त्याला नाटक, अभिनयाची गोडी लागली होती, ती त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. पुण्यातील नाट्यसंगतही सोडवत नव्हती. त्याला लहानपणापासून खेळाचीही आवड होती.

कोल्हापूरला आल्यानंतर त्याने कॉमर्स कॉलेजमध्ये बीबीएला प्रवेश घेतला. पण, इथे आल्यानंतरही त्याने इव्हेंटचा छंद कमी केला नाही. जुलै २०१३ मध्ये त्याने कोल्हापुरात एका मोठ्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. यातून त्याचे नाव झाले. नंतर त्याला २०१३ मध्ये ३१ डिसेंबरचा एका मोठ्या समूहाचा सूत्रसंचालन करण्याचा मान मिळाला.

२०१६ मध्ये त्याचे बीबीए पूर्ण झाले. नंतर त्याने २०१८ मध्ये एक वर्ष  रेडिओमध्ये काम केले. याच दरम्यान पुण्यातही इव्हेंटमधील लोकांचा संपर्क होता. प्रो कबड्डीच्या लाँचिंगसाठी पुण्यात एका मॉलमध्ये त्याचे पहिल्यांदा अँकरिंग झाले. त्यात ‘प्रेझेंटेशन’ चांगले झाले. पुढे या प्रो कबड्डीच्या सामन्यासाठीही स्टार स्पोर्टसकडून त्याची निवड झाली.  या सर्व व्यापातून त्याने आपल्या नाटकाची ऊर्मी कमी होऊ दिली नाही. 

‘आसक्त कलामंच’ या ग्रुपसोबत तो कार्यरत आहे. त्याला अनेक सेलिब्रेटीजबरोबर काम करण्याची संधी मिळाली आहे. झाकीर खान, नसरुद्दीन शहा, इम्तियाज अली, रिचा छड्डा, संजय मिश्रा यांचा त्यात समावेश आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com