प्रतीक शिवशरण हत्याप्रकरणी मारेकऱ्याना फाशीची शिक्षा झाली पाहिजे - रामदास आठवले 

दावल इनामदार 
गुरुवार, 15 नोव्हेंबर 2018

ब्रह्मपुरी (सोलापुर) - प्रतीक शिवशरण हत्या प्रकरणात दोन आठवड्याचा कालावधी उलटूनही पोलीस पथकास अजूनही तसाप लागला नाही. तरी तपास सीआयडीकडे देण्यास मुख्यमंत्राशी बोलणार असून रिपब्लिकन पक्ष शिवशरण कुटुंबाच्या पाठीशी आहे. त्यामुळे मी सर्वोतोपरी मदत करेन असे आश्वासन केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी दिले.

ब्रह्मपुरी (सोलापुर) - प्रतीक शिवशरण हत्या प्रकरणात दोन आठवड्याचा कालावधी उलटूनही पोलीस पथकास अजूनही तसाप लागला नाही. तरी तपास सीआयडीकडे देण्यास मुख्यमंत्राशी बोलणार असून रिपब्लिकन पक्ष शिवशरण कुटुंबाच्या पाठीशी आहे. त्यामुळे मी सर्वोतोपरी मदत करेन असे आश्वासन केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी दिले.

प्रतिक हत्या प्रकरण घटना घडून तीन आठवडे कालावधी गेला. तरिही पोलिसाचा पथकाचा तपास सुरू असून, मारेकरीचा अद्यापही शोध लागला नाही. ही अंत्यत गंभीर प्रकारची घटना असून मुख्यमंत्री यांना भेटून मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. असे प्रयत्न करीत असून प्रतिकच्या हत्येने दुखात असलेल्या शिवशरण कुटूंबाची भेट घेवून सांत्वन केले व मुख्यमंत्रयाशी भेटून शासनास आर्थिक मदतीचीही मागणी करेन. 
यावेळी महात्मा फुले आर्थिक विकास महामंडलाचे अध्यक्ष राजाभाऊ सरवदे, सुनील सर्वगोड, अशोक सरवदे, अशोक शिवशरण, बाबा साखरे, भीमराव मोरे, नितिन सोनवले, रतिलाल सावंत, प्रकाश सावंत, चिमाजी कसबे, जितेंद्र बनसोडे, हणमंत कसबे, दीपक चंदनशिवे, नागेश भोसले, बापू बनसोडे, युवराज सावंत, विविध संघटनेचे पदाधिकारी, शासकीय अधिकारी, बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.

यावेळी बोलताना आठवले म्हणाले, की या हत्या प्रकरणी घटनेचा ॲट्रॉसिटीचा गुन्हा लागणे अत्यंत आवश्यक होतं. हे प्रकरण गंभीर असून नरबळी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी मी स्वतः आज मुख्यमंत्र्याची भेटून सीआयडीकडे तपास देऊन मारेकऱ्यांना लवकरात लवकर फाशी द्यावी अशी मागणी करणार आहे. पोलिस चौकशीत ऍट्रॉसिटीचा ऍक्ट लागला असता तर सव्वा आठ लाख रुपयाची मदत मिळाली असती आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे शिवशरण कुटुंबीयास दीड लाखाची आर्थिक मदत करीत आहोत. प्रतिक शिवशरण हत्या प्रकरण गंभीर असून नरबळी असण्याची शक्यता आहे. मधुकर शिवशरण यांच्या गावांमध्ये शत्रुत्व असल्यामुळे हत्या झाल्याचे वाटत आहे. तसेच या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे देऊन लवकरात लवकर आरोपींना पकडावे स्थानिक पोलिस प्रशासनास यश लागत नसल्यामुळे मी स्वतः मुख्यमंत्री मागणी करून सीआयडीकडे वर्ग करन्यासाठी प्रयत्न करणार आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कुटुंबाच्या पाठीशी असून तपास नाही लागल्यास जिल्हाधिकारी पोलीस, डीएसपी कार्यालयावरती  आरोपी जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत भव्य मोर्चे काढण्यात येईल असेही आठवले यांनी सांगितले. यावेळी माचणुर व परिसरातील बहुसंख्य नागरिकानी मारेकरीचा तपास लवकर लागावा अशी मागणी केली.

Web Title: pratis murderer should get death penalty - ramdas aathavle