सातारा : कोरोना संशयितांना निगराणीखाली 'येथे' ठेवणार

सातारा : कोरोना संशयितांना निगराणीखाली 'येथे' ठेवणार

सातारा ः जिल्ह्यात परदेशातून आलेल्या 17 प्रवाशांपैकी फक्त एक संशयीत  सध्या उपचाराखाली असून अजून परदेशात गेलेले जिल्ह्यातील 26 जण येणार आहेत. त्यांच्याबाबत प्रशासन सर्व दक्षता घेणार आहे. दरम्यान, जिल्ह्यात कोरोना संशयितांना निगराणीखाली ठेवण्यासाठी जिल्ह्यातील विविध सहा हॉस्पिटलमध्ये 18 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याशिवाय सर्वोदय अभियांत्रीकी महाविद्यालय व नवोदय विद्यालय (खावली) येथेही बेडची व्यवस्था केली आहे. जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
 
कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये, संशयितांना तातडीने उपचार मिळावेत या बरोबरच नागरिकांचे प्रबोधन करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, उपाध्यक्ष प्रदिप विधाते, शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे, इतर पदाधिकारी, तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, डॉ. सचिन पाटील उपस्थित होते. कोरोनासदृश्‍य लक्षणे आढळल्यास संबंधीत रुग्णाला ठेवण्यासाठी जिल्हा शासकीय रुग्णालय (सातारा), कृष्णा मोडिकल कॉलेज (कऱ्हाड), संजीवनी हॉस्पिटल (सातारा), अजिंक्‍यतारा हॉस्पिटल (सातारा), सातारा हॉस्पिटल (सातारा), साईअमृत हॉस्पीटल (सातारा) या सहा रुग्णालयांतून एकूण 18 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे.

त्याशिवाय सर्वोदय अभियांत्रीकी महाविद्यालय आणि नवोदय विद्यालय (खावली) येथेही बेडची व्यवस्था केली आहे. दरम्यान, जिल्ह्यात परदेशातून प्रथम आलेल्या 18 पैकी एक व्यक्ती हॉस्पिटलमध्ये निगराणीखाली ठेवण्यात आली आहे. 17 जणांना त्यांच्या राहत्या घरी निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. त्यापैकी चार जणांचे निगराणीखालील 14 दिवस पूर्ण झाले आहेत. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने विविध प्रवाशी कंपन्याकडून उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांमार्फत परदेशात गेलेल्यांची माहिती घेण्यात येत आहे. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे अद्यापही 26 जण परदेशातून जिल्ह्यात येणार आहेत. त्यांच्याबाबतीत आरोग्य विभाग पुर्ण दक्षता घेणार असल्याची माहितीही पदाधिकाऱ्यांनी दिली.

हेही वाचा : ...यांच्या वादात हरवतोय विकास

वाचा : भोंदूबाबांना बसवा कायद्याची जरब

आरोग्य विभागाच्या वतीने कोरानो विषाणूबाबत प्रबोधन करण्यात येत आहे. नागरिकांच्या प्रबोधनासाठी सूचना फलक लावण्यात आले आहेत. अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सभा घेऊन त्यांना या विषाणूबाबत माहिती देण्यात आली आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत अंगणवाड्या, शाळा, महाविद्यालयातही जाऊन मार्गदर्शन केले जात आहे. जिल्हा व तालुकास्तरावर आरोग्य विभागाची शिघ्र प्रतिसाद पथके स्थापन करण्यात आली असून नागरिकांनी आरोग्य विभागाच्या सुचनांप्रमाणे दक्षता घ्यावी, असे आवाहन उदय कबुले यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com