अवकाळीने उसतोडणीत आडकाठी सुरूच; शेतकऱ्यांचे जगणे झाले कठीण

उसाच्या शेतातून दोन ट्रॅक्टरच्या सहाय्याने उसाने भरलेला ट्रॅक्टर बाहेर काढावा लागत आहे.
अवकाळीने उसतोडणीत आडकाठी सुरूच; शेतकऱ्यांचे जगणे झाले कठीण

बेडकिहाळ : यंदाचा गळीत हंगाम सुरु होऊन दीड ते दोन महिने झाले. या काळात दोनवेळा वादळी पाऊस झाल्याने ऊस तोडणीवर परिणाम झाला. अशा वातावरणातच रस्त्यावरील ऊस तोडणीसाठी ऊसतोड मजूर सरसावले. पण ढगाळ हवामानासह अधून-मधून पडणारया पावसामुळे ऊस तोडणी करण्यासाठी अडचण निर्माण होत आहे. तोडलेल्या उसाच्या मोळ्या गाडीत, ट्रॅक्टरमध्ये भरून बाहेर काढण्यासाठी हाल होत आहेत.

ऊस क्षेत्रात पावसाने ओल झाल्याने भरलेली बैलगाडी, ट्रॅक्टर शेतातून बाहेर काढताना कसरत करावी लागत आहे. उसाने भरलेला टॅक्टर शेतातून बाहेर काढण्यासाठी एक ते दोन जादा ट्रॅकटरची मदत घ्यावी लागत आहे. त्यासाठी इतर ट्रॅक्टरचालक ५०० ते ८०० रुपये तर जेसीबीधारक ८०० रुपये दर आकारत आहेत. अतिवृष्टीमुळे नदी परिसरातील ऊस क्षेत्र पूर्णपणे बुडून गेले असून उभ्या उसाचे नुकसान झाले आहे. त्याचे सर्वेक्षण झाले असले तरी अद्यापही ही बऱ्याच शेतकऱ्यांना शासनाचा येणारा मोबदला मिळालेला नाही. उसाचा उत्तम उतारा साध्य करण्यासाठी भरमसाट रक्कम खर्च केली होती. पण महापुराने पीक वाया गेले. तसेच सततच्या पावसाने यंदाच्या हंगामावरही परिणाम झाला आहे.

`नदी परिसरात आमचा दोन एकर ऊस आहे. दोन महिन्यातील पावसाने अर्धे बुडीत झाले होते. यातून उरलेला ऊस चांगला आहे. आता दोनवेळा तोड आली होती. पण पावसाने रस्त्याची अडचण असल्याने व चिखल झाल्याने तोडणी खोळंबली.`

-सुधाकर निंबाळकर,

युवा शेतकरी, बेडकिहाळ

`आठ दिवसापासून सतत पडत असलेल्या पावसामुळे ऊस तोड करणे कठीण होत आहे. शेतातील चिखलामुळे तोडणीस विलंब होत आहे. ट्रॅक्टर भरताना त्रास होत आहे. घरच्या जनावरांना वैरण हवी म्हणून या काळातही माळ भागातील ऊस तोडत आहोत.`

-पोपट बाणगे,

ऊस तोड मजूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com