भक्त निवास : क्षमता 90 जणांची, बुकिंग 60 जणांचे (Video)

प्रशांत देशपांडे
Thursday, 2 January 2020

सिद्धेश्‍वर मंदिर परिसरातील भक्त निवासात आठ बेडच्या सात, तीन बेडच्या आठ, दोन बेडच्या दोन खोल्या असून एक मोठा हॉल आहे. यात्रेस येणाऱ्या भविकांकडून आतापासूनच बुकिंग सुरू झाले आहे. कर्नाटक राज्यातील बल्लारी, अनंतपूर, बंगळुरू, ढवळेश्‍वर येथील 60 भाविकांना बुकिंग केले आहे.

सोलापूर : ग्रामदैवत श्री सिद्धेश्‍वर महाराजांची यात्रा काही दिवसांवर आहे. त्यानिमित्त महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेशसह विविध राज्यांतून मोठ्या प्रमाणावर भाविक येतात. यात्रा काळात मंदिर समितीच्या वतीने भक्त निवासात यात्रेकरूंच्या राहण्याची व्यवस्था होते. परराज्यातील यात्रेकरू येथील भक्‍त निवास बुकिंग करत आहेत. सिद्धेश्‍वर मंदिर समितीच्या भक्त निवासात 17 रूम असून 80 ते 90 भाविकांच्या राहण्याची व्यवस्था होते. वर्षभरात 10 ते 15 हजार भाविक येथे येतात. 

हेही वाचा : मोठी बातमी : शिवसेनेत नाराजीचा स्फोट
असे आहे भक्त निवास 

सिद्धेश्‍वर मंदिर परिसरातील भक्त निवासात आठ बेडच्या सात, तीन बेडच्या आठ, दोन बेडच्या दोन खोल्या असून एक मोठा हॉल आहे. यात्रेस येणाऱ्या भविकांकडून आतापासूनच बुकिंग सुरू झाले आहे. कर्नाटक राज्यातील बल्लारी, अनंतपूर, बंगळुरू, ढवळेश्‍वर येथील 60 भाविकांना बुकिंग केले आहे. यात्रा काळात पोलिस, मुख्य अतिथींकरिता दोन खोल्या व अन्य ठिकाणाहून येणाऱ्या वृत्तवाहिनांच्या प्रतिनिधीकरिता काही खोल्या आरक्षित असतात. 

देण्यात येणाऱ्या सुविधा 
सिद्धेश्‍वर मंदिरातील भक्त निवासात भाविकांना मंदिर समितीकडून आंघोळीस गरम पाणी देण्यात येते. यात्रेव्यतिरिक्‍त पंचक्रोशितील येणाऱ्या भाविकांना भक्‍त निवासात स्वच्छता, 24 तास पाण्याची आणि विजेची व्यवस्था आहे. अन्य भाविकांना मुखमार्जनासाठी 20 रुपये आकारले जातात. 

हेही वाचा : सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात आता हे गाव चर्चेत
भक्त निवासाचे दर
 
दोन सिंगल बेड रूम : 700 
तीन सिंगल बेड : 500 
आठ बेड रूम : (प्रति व्यक्तीस) 100 
हॉल प्रति व्यक्तीस : 100 

भक्त निवासात तयारी 
यात्रेसाठी भक्त निवास सज्ज आहे. बाहेर गावाहून येणाऱ्या भक्तांची मंदिर समितीच्या वतीने नेहमीच चांगली सोय करण्यात येते. यंदा मोठ्या प्रमाणावर भाविक येणार असल्याने भक्त निवासात तयारी झाली आहे. काही प्रमाणात बुकींग झाले असून 13 जानेवारीपासून पूर्ण बुक होईल. 
- अशोक हुच्चे, व्यवस्थापक, भक्त निवास, श्री सिद्धेश्‍वर देवस्थान


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Preparation of Solapur Siddheshwar yatra