भाजप खासदाराच्या पत्रकार परिषदेला शिवसेनेचे आमदार

Ranjitsih Nimbalkar.jpg
Ranjitsih Nimbalkar.jpg

सांगोला (सोलापूर) : भाजप खासदाराच्या सांगोला येथील पत्रकार परिषदेला शिवसेना आमदाराने उपस्थित राहुन विविध प्रश्नांवर चर्चा तर केली. परंतु वरच्या युतीने आमची गोची झाली असेही आमदार म्हणुन गेले. उशिरा आलेल्या आमदारांना खुर्ची देण्‍याच्‍या व उभे राहण्याच्या कारणावरून या पत्रिकर पत्रकार परिषदेत चांगलाच हास्यकल्लोळ झाला. आता खुर्ची दिली आहे पाच वर्षे तुम्हीच बसा, आधी डोक्यावर घेतलेलंच आहे. आता उभे राहतो यापुढे आम्ही उभा (निवडणुकीत) राहणारच आहोत. या भाजपाच्या तालुकाध्यक्षांच्या विधानाने राजकारणाची नवी दिशा स्पष्ट केली. त्यामुळे ही पत्रकार परिषेद शिवसेना- भाजपा पदाधिकार्‍यांच्या शेरेबाजीने चांगलीच गाजली.
माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे सांगोल्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी तालुक्यातील विविध पदाधिकारी व नागरिकांच्या त्यांनी समस्या जाणून घेऊन सोडविण्याचा प्रयत्न केला. ही पत्रकार परिषदत प्रश्नांऐवजी गाजली ती भाजपा- शिवसेना आमदार पदाधिकाऱ्यांच्या शेरेबाजीने. या पत्रकार परिषदेसाठी निंबाळकर यांच्याबरोबर भाजपचे तालुकाध्यक्ष श्रीकांत देशमुख उपस्थित होते. पत्रकार परिषद सुरू झाल्याने थोड्यावेळाने शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील उपस्थित झाले. समोर दोनच खुर्च्या असल्याने श्रीकांत देशमुख हे उठून बाजूला झाले असता आमदारांनी बसा, बसा असे सांगितले. परंतु भाजपाचे देशमुख यांनी आता पाच वर्षे तुम्हीच बसा. डोक्यावर घेतले आहे, तर बसून घ्या. यापुढे आम्ही उभा (निवडणुकीत) राहणार आहे, असे आवर्जून सांगितल्याने पत्रकार परिषदेत एकच हास्यकल्लोळ झाला. आमदार शहाजीबापू पाटील यांनी पत्रकार परिषदेत सुरवातीलाच वरच्या युतीने आमची गोची झाली असेही बोलून गेले. आता तुम्हालाच उभे करतो असे भाजपाचे देशमुख यांच्याकडे पाहत शिवसेना आमदार बोलल्याने पुन्हा पत्रकार परिषदेत हशा पिकली. आता आमदार झाला आहात. एक वर्षे पण पुरे झाले असे खासदार रंणजीतसिंह निंबाळकर यांनी आमदार शहाजीबापू पाटील यांना उद्देशून बोलले. यावेळी आमदार शहाजीबापूंनी हसतच बास. .बास म्हणून प्रतिसाद दिला. यामुळे या पत्रकार परिषदेमध्ये खासदार, आमदार व शिवसेना - भाजपाच्या पदाधिकाऱ्यांच्या टोलेबाजीमुळे चांगलीच गाजली व याची चर्चा शहरभर सुरू झाली.
पत्रकारांपेक्षा पदाधिकाऱ्यांचीच गर्दी
खासदारांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेसाठी पत्रकारांपेक्षा पदाधिकाऱ्यांची मोठी गर्दी झाली होती. काही पत्रकारांना बसण्यासाठी जागाही उपलब्ध नव्हती. शेवटी पत्रकारांनी उभे राहून प्रश्न विचारले. परंतु पदाधिकारी बाजूला झाले नाहीत. यावेळी एका नेत्याने पत्रकार व पदाधिकाऱ्यांची परिषद आहे, असाही उपरोधिक टोला मारला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com