प्राथमिक शिक्षकांना "बीएलओ'ची सक्ती नको 

प्राथमिक शिक्षकांना "बीएलओ'ची सक्ती नको 
Updated on

सातारा : प्राथमिक शिक्षकांना "बीएलओ'म्हणून काम करण्याची सक्ती करू नये, अशी विनंती कोरेगाव तालुका प्राथमिक शिक्षक समितीने कोरेगाच्या प्रांताधिकारी तथा कोरेगाव विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कीर्ती नलावडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. शिक्षकांना याबाबतच्या ऑर्डर्सही बजावू नयेत, अशी विनंती समितीचे कोरेगाव तालुकाध्यक्ष नितीन शिर्के, त्यांच्या शिष्टमंडळाने केली. 

प्राथमिक शिक्षकांना दुसऱ्या सत्रात स्पर्धा परीक्षा, वार्षिक स्नेहसंमेलन, क्रीडा स्पर्धा, वार्षिक तपासणी, विविध उपक्रम शाळेत राबबावे लागतात. त्यामुळे शिक्षकांना मुलांना सोडून तितकासा वेळ या अशैक्षणिक कामाकरीता मिळत नसल्याचे प्राथमिक शिक्षक बॅंकेचे संचालक किरण यादव यांनी पटवून दिले.

नक्की वाचा -  शुभमंगलचंही होईना मंगल!
 
ज्या शिक्षकांना ऑर्डर्स आलेल्या आहेत, त्यांनाही कामाची सक्ती करू नये अशी विनंती समितीचे मार्गदर्शक नेते व माजी सरचिटणीस गणेश लोखंडे यांनी केली. या कामाच्या विरोधात महाराष्ट्र राज्य शिक्षक समितीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्याबाबत निर्णय होण्याची शक्‍यता आहे. निवडणूक आयोगाने काम कोणी करावे याबाबत प्रसिद्ध केलेल्या 12 व्यक्तींमध्ये "प्राथमिक शिक्षक' असा कुठेही उल्लेख नसल्याचे प्रांताधिकारी यांना दाखवून देण्यात आले.

दरम्यान, प्रांताधिकारी नलावडे यांनी निवेदन स्वीकारून याबाबत वरिष्ठांशी बोलून निर्णय घेण्याची ग्वाही दिली. या वेळी तालुका शिक्षक समितीचे उपाध्यक्ष उदय घोरपडे, राजकुमार गडकरी, हेमंतकुमार जाधव, वसंत चव्हाण, सुधीर कुमठेकर आदी सदस्य उपस्थित होते.

हेही वाचा - सागरिका कॅंटीनचा प्रयोग राज्यभर राबवू : मंत्री देसाई

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Nipani flyover wall collapse
Eknath Shinde Stays Disqualification Order
Koyna Dam discharge latest update
Koyna Dam released water through its spillway gates for the first time this monsoon after the reservoir level increased due to continuous rainfall.
Marathi News Esakal
www.esakal.com