सागरिका कॅंटीनचा प्रयोग राज्यभर राबवू : मंत्री देसाई 

Minister Shambhuraj Desai S P Tejswi Satpute
Minister Shambhuraj Desai S P Tejswi Satpute
Updated on

सातारा : सातारा पोलिस दलामार्फत सुरू असलेल्या सागरिका पोलिस कॅंटीनमध्ये नव्याने सुरू करण्यात आलेल्या अभिनव अशा इलेक्‍ट्रॉनिक वस्तू विक्री दालनामध्ये इलेक्‍ट्रॉनिक वस्तूंवर पोलिस विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना 45 ते 50 टक्‍क्‍यांपर्यंत सूट मिळत आहे. यामुळे त्यांना आर्थिक मदत होत असल्याने सातारा पोलिस दलाचा कॅंटीनचा स्तुत्य उपक्रम राज्यभर राबविणार असल्याचे प्रतिपादन गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी आज केले. 

पोलिस दलाच्या येथील पोलिस करमणूक केंद्रामार्फत चालविण्यात येणाऱ्या पोलिस कॅंटीनचे नूतनीकरण करण्यात आले आहे. याचे व नव्याने सुरू करण्यात आलेल्या इलेक्‍ट्रॉनिक वस्तूविक्री दालनाचे उद्‌घाटन शनिवारी मंत्री देसाई यांच्या हस्ते झाले. पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अतिरिक्‍त पोलिस अधीक्षक समीर शेख, पोलिस उपअधीक्षक (गृह) राजेंद्र साळुंके आदी उपस्थित होते. 

मंत्री देसाई म्हणाले, ""सातारा पोलिस दलाने इलेक्‍ट्रॉनिक वस्तू विक्रीचे दालन सुरू करून अधिकारी, कर्मचाऱ्यांना आर्थिक मदत केली आहे. ज्या जिल्ह्यात जाईन त्या ठिकाणी पोलिस कॅंटीनची माहिती घेऊन सातारा पोलिस दलाने सुरू केलेल्या उपक्रमांच्या धर्तीवर कॅंटीन चालविण्यासाठी सांगणार आहे.'' 

तेजस्वी सातपुते म्हणाल्या, ""कमीतकमी दरामध्ये पोलिस विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना दैनंदिन वस्तू मिळाव्यात, हा या पोलिस दलाच्या कॅंटीनचा उद्देश आहे. 25 हजार ते 30 हजारांपर्यंत सागरिका कॅंटीनमधल्या वस्तूची विक्री होत होती. आता या कॅंटीनमधील वस्तूंची विक्री एक लाख ते 1 लाख 50 हजारांपर्यंत दररोज होत आहे. या कॅंटीनमध्ये आणखीन वस्तू वाढविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. हे कॅंटीन माजी सैनिकांसाठी उपलब्ध असून, माजी सैनिकांनी येताना ओळखपत्र घेऊन यावे.'' 


पोलिस उपनिरीक्षक गणेश वाघ यांनी कॅंटीनबाबत माहिती दिली. या वेळी पोलिस विभागातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Social Reforms: MAnis Announces State-Level Awards for Dedicated Rationalist Activists
six people killed in Maharashtra Karnataka border land dispute vijapur chadchan crime
Crime
Ek Bharat Shreshtha Bharat Program News
Marathi News Esakal
www.esakal.com