प्रधानमंत्री फळ-पीक विमा योजना, बनावट याद्या व्हायरल

महेश पाटील
शनिवार, 12 जानेवारी 2019

सलगर बुद्रुक (सोलापूर) - गेल्या वर्षी डाळींब पिकासाठी भरलेल्या हवामान आधारीत प्रधानमंत्री फळ पीक विमा योजनेतील पात्र लाभार्थ्यांच्या याद्या मंजूर रकमेसहित तीन दिवसापासून व्हाट्सएपच्या माध्यमातून सगळीकडे व्हायरल झाल्या आहेत. डाळींब पिकासाठी हेक्टरी ६५ हजार पाचशे रुपये विमा मंजूर असल्याचे त्या याद्यांमध्ये उल्लेख आहे. गेल्या दोन दिवसांपासून सगळीकडे मोबाईल हातून घेऊन सदरच्या यादीमध्ये आपली नावे आहेत का ते पाहण्यात सगळे व्यस्त आहेत. एवढ्या मोठ्या दुष्काळी परिस्थितीत विमा रकमा मंजूर झाल्याने शेतकरी सुखावले आहेत.

सलगर बुद्रुक (सोलापूर) - गेल्या वर्षी डाळींब पिकासाठी भरलेल्या हवामान आधारीत प्रधानमंत्री फळ पीक विमा योजनेतील पात्र लाभार्थ्यांच्या याद्या मंजूर रकमेसहित तीन दिवसापासून व्हाट्सएपच्या माध्यमातून सगळीकडे व्हायरल झाल्या आहेत. डाळींब पिकासाठी हेक्टरी ६५ हजार पाचशे रुपये विमा मंजूर असल्याचे त्या याद्यांमध्ये उल्लेख आहे. गेल्या दोन दिवसांपासून सगळीकडे मोबाईल हातून घेऊन सदरच्या यादीमध्ये आपली नावे आहेत का ते पाहण्यात सगळे व्यस्त आहेत. एवढ्या मोठ्या दुष्काळी परिस्थितीत विमा रकमा मंजूर झाल्याने शेतकरी सुखावले आहेत. पण बॅंकांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे आले नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत. 

बॅंकेमध्ये शेतकऱ्यांनी विचारपूस केली असता बॅंकेला विमा कंपनीकडून व प्रशासनाकडून कसलीच माहिती मिळाली नसल्याचे समोर आल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत. सदरच्या प्रकाराबद्दल सकाळ कडून जिल्हा कृषी अधीक्षक व बॅंक कर्मचाऱ्यांकडे विचारपूस केल्या नंतर पीक विम्या संदर्भात कसलीच माहिती प्राप्त नसल्याचे सांगण्यात आले. मग अश्या स्वरूपात विमा धारक लाभार्थ्यांची यादीचे काय गौड बंगाल आहे याबद्दल उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे.  

मी प्रधान मंत्री फळ पीक विमा योजनेत हेक्तरी  सहा हजार पन्नास रुपये विमा शुल्क भरले होते.आत्ता व्हायरल झालेल्या यादीमध्ये माझे नाव आहे. पण बॅंकेत खात्यावर पैशे आले नाहीत.
- सचिन चौधरी शेतकरी सलगर बुद्रुक

पीक विम्याच्या यादीसंदर्भात मला कांही माहिती नाही.या याद्या कश्या व्हायरल झाल्या हेही माहीत नाही. सोमवारनंतर मी या संदर्भातील माहिती घेणार आहे. 
- बसवराज बिराजदार, जिल्हा कृषी अधीक्षक सोलापूर    

पीक विम्या संदर्भात कसलीच माहिती बॅंकेस प्राप्त झाली नाही. आमच्या शाखेच्या कोणत्याच ग्राहकाच्या नावावर पिकविम्याचे पैशे जमा नाहीत. यादीबद्दल आम्हाला कांही माहिती नाही. 
- नरेंद्र कंधारी, शाखा व्यवस्थापक, बँक ऑफ इंडिया, मंगळवेढा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Prime Minister Fruit-Crop Insurance Scheme, falls Lists Viral